*जनता कर्फ्यु लावण्याची मागणी
*कन्हान शहर विकास मंच चे मुख्याधिकारी , नगराध्यक्षा , व पोलीस प्रशासनाला मास्क देऊन
दंडात्मक कारवाई करण्याची मागणी
कन्हान – शहरात व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन मृत्यु रुग्णांची संख्या दिवसन दिवस वाढत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या रोखण्याकरिता कन्हात शहरात आठ दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याची मांगणी कन्हान शहर विकास मंच च्या वतीने नप मुख्याधिकारी , नगराध्यक्ष व पोलीस प्रशासनाला मास्क देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कन्हान शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या , मृत्युची संख्या वाढत असुन नगर परिषद प्रशासन द्वारे कुठल्याही प्रकारची सेनिटाइजर ची फवारणी होत नसुन शहरा मधल्या बाजार पेठेत कुठल्याचे प्रकारचे सोशल डिस्टेन्स व मास्क चे वापर होत नसल्याचे दिसुन येत आहे.
कन्हान शहरात सर्वात मोठा बाजार पेठे असुन आजु-बाजुच्या ग्रामीण भागातुन शेतकरी व नागरिक खरेदी विक्री करण्याकरिता येत असतात हेच व्यापारी , भाजीपाला दुकानदार व नागरिक सरकारी नियमाचे पालन न करित असल्यामुळे शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अजुन वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई शहरात करणे गरजेचे झाले आहे.
कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या ६23 झाली असुन मृत्यु ची संख्या १८ झाली आहे.
कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , कन्हन पोलीस स्टेशन चे एपीआई अमित कुमार आतराम यांना मास्क देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे निवेदन देऊन कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत सेनिटाइजर ची नियमित फवारणी व मास्क , सोशल डिस्टेसिंग चे पालन न करणा-र्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी व आठ दिवसाचे जनता कर्फ्यु लावण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , प्रसिद्धि प्रमुख नितिन मेश्राम , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , सदस्य प्रवीण माने , शाहरुख खान आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.