*तालुक्यातील महा आघाडीतील पक्षाना एकत्र ठेवणे शक्य झाल्यामुळेच हा विजय काग्रेंस ला पहायला मिळाला*
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
*पाराशिवनी* (त. प्र ):-पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. तर भाजपने एकही ग्रामपंचायतीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले नाही. पदवीधर निवडणुकीत तालुक्यातील महाविकास आघाडीतील पक्षाना एकत्र ठेवणे शक्य झाल्यामुळेच आजचा हा विजय काग्रेंस ला पहायला मिळाला, अशी भावना कार्यकत्यात दिसून आली.
कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी तालुक्यातील काँग्रेसचे केदार गट, चंद्रपाल चौकसे गट, राजेंद्र मुळक गट ,गज्जु यादव ,यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक एकत्रपणे लढण्यास सक्त ताकीद दिली होती. तसेच शिवसेना सर्मथितआमदार अँड. आशिष जैस्वाल गट, राष्ट्रवादी व प्रहार पक्ष देखील काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढले. मोजक्या ठिकाणी अपवाद वगळता जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकून आले. भाजपने फक्त खेडी, नवेगाव खैरी, निमखेडा व माहुली या ग्रामपंचायतीत बोटावर मोजण्या इतपत उमेदवारांचे खाते उघडले. सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या
(१) *माहुली ग्रामपंचायतीत* महाविकास आघाडीचे ८ उमेदवार जिंकून आले यात महेन्द्र घोडमारे सर्वाधिक १२३मतानी विजयी झाले . तर २ भाजप व एक प्रहारचा उमेदवार जिंकून आला.
(२)*बाबुळवाडा ग्राम पंचायतीत* सुनील केदार सर्मथित इंद्रपाल गोरले गटाचे ४ काँग्रेस तर ३ उमेदवार सेनेचे निवडून येऊन येथे महाविकास आघाडीने आपला झंडा गाडला इंन्दपाल गटाची मायाताई गोरले २०१ सर्वाधिक मतानी विजयी झाले.
(३) *पिपळा ग्रामपंचायतीत* राष्ट्रवादीचे सचिन आमले ९०मतानी विजयी झाले व काँग्रेसचे गौतम गजभिये गटाने ५ उमेदवार जिंकून आणले तर दोन प्रहारचे उमेदवार जिंकून आणून महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण केले.यात चंदा विनोद ठाकरे ६९मतानी विजयी ठरली.
(४) *नवेगाव खैरी ग्राम पंचायत* येथे केदार सर्मथक कमलाकर कोठेकर विजयी होउन स्वत गटाचे काँग्रेसचे ६ उमेदवार जिंकून आणून आपले वर्चस्व कायम ठेवले. , शिवसेनेने सहकार्य केले. (५) सुवरधरा ग्राम पंचायत येथे विधायकआशिष जैस्वाल सर्मथक गटाने ग्रामपंचायत काबीज केली. येथे केशवंता ज्ञानेश्वर ईरपाची आणी विनोद गंगाधर कुमरे प्रत्येकी २००पेक्षा अधिक मतानी विजयी झाले ,हे विशेष, ४ सेनेचे,२ काँग्रेस व एक अन्य निवडून आले.
(६) *ईटगाव ग्राम पंचायत* येथे काँग्रेस ६ तर अन्य ३ उमेदवार जिंकून आले.येथे ज्योती विनायक मोहनकर २०२मते तर आरती लिलाधर सुर्यवंशी हिने २०५मत घेऊन मात्र ३तिन मतानी आरती सुर्यवंशी विजयी ठरली .
(७) *निमखेडा ग्रामपंचायतीत* भाजपचा दणदणीत पराभव होऊन काँग्रेसचे ५ उमेदवार जिंकून येऊन काँग्रेसने ग्रामपंचायत ताब्यात घेतली.
(८) *खेडी ग्रामपंचायतीत* काँग्रेसने आपले ६ उमेदवार जिंकून आणून महाविकास आघाडीचा झंडा गाडला. येथे भाजपला ३ वर थांबावे लागले.
(९) *बोरी* (सिंगरदीप)ग्राम पंचायत*येथे महाविकास आघाडी जिंकून आली पुरशोतम ईखार ६सहा मतानी विजयी झाले ,तसेच बोरी सिगादिप प्रभाग १अ मधुन रविन्द्र रामभाउ दोडके यांनी ११५मत घेत विरोधक अनिल विठल्राराव कुथे यांनी ११६मत घेउन फक्त एका १ मतानी विठ्ठल कुथे विजयी झाले पारा शिवनी तालुकातील् सर्वात कमी फक्त एक मताने विजयी ,है विशेष .
(१०) *खंडाळा ग्राम पंचायत* येथे युवक काँग्रेसचे रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल पाटील गट व शिवसेना गटाने महाविकास आघाडीचे सदस्य जिंकून आणले. येथे चेतन रमेश कुभलकर यानां ४४३मते घेऊन महादेव चन्द्रभान गावंडे २२४मत घेणारे याचां २२०मतानी पराभव केला, तसेच साविता नितेश तेलोदे ४६२मत घेऊन कविता कवडु मेक्षाम नी २२७मत घेऊन साविता तेलोदे ही २३५मतानी विजयी झाली हे विशेष की साविता तेलोदे हिने तालुका तिल निवडणुकित दहा ही ग्रा पं मधुन सर्वाधिक मतानी विजयी झाली यावेळी राजेन्द्र मुलक ,(कोग्रस जिला अध्यक्ष( गज्जु यादव (जिला महासचिव) नरेश वर्वे (जिला उपाध्यक्ष) रश्मी बर्वे,(जि.प. अध्यक्ष) श्रीधर झाडे, दयाराम भोयर(तालुका अध्यक्ष),शिवकुमार यादव (कामगार नेते),अर्चना भोयर (जि प सदस्या) ,मिना प्रफुल्ल कावळे (सभापती पं स),राजकुमार कुसुबे,(जि प सद्रस्य) अशोक चिखले,(अध्यक्ष बजार सामिती) प्रदीप दियेवार(अध्यक्ष सरपंच संघ),काँग्रेस ,राष्ट्रवादी,शिवसेना,प्रहार,सह महा आघाडी चे खर्व पदाधिकारी,कार्यकर्ते कार्यकर्ते यांनी जिंकलेल्या उमेदवाराचे अभिनंदन केले.