*नाना पटोले यांचा विरोधात भाजपचे प्रदर्शन*
*नाना पटोले यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
कन्हान –
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्द्ल महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपमान जनक टिप्पणी केल्याचा निषेधार्थ भाजपा शहरच्या पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन, गांधी चौक येथे नाना पटोले यांचा विरोधात जोरदार प्रदर्शन करुन व पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तहसील अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिति चुनाव प्रचार दरम्यान नागरिकांशी चर्चा करतांना नाना पटोले यांनी बोलले की “मै मोदी को मार सकता हूँ और गाली दे सकता हूं”
असंवैधानिक भाषण केल्याने भाजपा पदाधिकार्यांचा मणात तीव्र रोष निर्माण झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन समोर गांधी चौक येथे भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे, तालुका अध्यक्ष अतुल हजारे , व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात नाना पटोले यांचा विरोधात प्रदर्शन करुन व पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देऊन एफ.आई.आर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे ,भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, महामंत्री अमिष रुंघे , भाजपा अनु: सुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे , उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, महामंत्री अमिष रुंघे , भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , महामंत्री सचिन वासनिक, तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , उपाध्यक्ष मनोज कुरडकर , शहर अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी, उपाध्यक्ष दिपनकर गजभिए , महामंत्री चंद्रगुप्ता पानतावणे, शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमोल साकोरे, शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के , प्रतीक्षा चवरे , माजी शहर अध्यक्ष विनोद किरपान, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे , भरत सावळे , कमलेश सिंग ठाकुर,भगवान सावरकर, नारायण गजभिए , नरेश पाटील, पारस यादव, आकाश वाडणकर, सचिन कांबळे, रुषभ बावनकर, अमन घोडेस्वार, आशिष सायरे ,नत्थुजी चरडे, प्रमोद वंजारी, सह आदि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .