विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक
सावनेर : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे . नातेसंबंधामुळे आरोपी घरी पाहुणा म्हणून मुक्कामी आला होता . नवनाथ शिवनाथ उर्फ शिवाजी सावंत ( वय २२ , अमडापूर , तालुका वरुड ) असे आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार पत्नीच्या घरी पाहुणा म्हणून मुक्कामी आलेल्या आरोपीने पीडित ही घरात झोपेत असताना तिच्याकडे जाऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि तुझ्या बहिणीसारखेच तुलाही ठेवायचे आहे . तुझे दुसरीकडे कुठेही लग्न होऊ देणार नाही असे धमकावून पीडितेचा विनयभंग केला . यावेळी पीडितेने आरडाओरड केल्यामुळे घरातील झोपी गेलेली मंडळी जागी झाली व आरोपीला घरून हाकलून लावले . तेव्हा आरोपीने जाताना शिवीगाळ केली व झाला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली .