तेजस संस्थे व्दारे रंजनिश मेश्राम चा सत्कार
# ) मनोरूग्ण निराघार महिलेस मौलिक मदत.
कन्हान : – हितज्योती आधार फाऊंडेशन च्या सहकार्याने कन्हान पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भटकलेल्या मनोरूग्ण महिलेस मदत करून आधार मिळवुन देणा-या कन्हान च्या रंजनिश मेश्राम या युवकाचा तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे सत्कार करण्यात आला.
कन्हान पोलीस स्टेशन लगत च्या शिवपंचायत हनुमान परिसरात काही दिवसापासुन असलेली निराधार मनोरूग्ण महिलेस बघुन रंजनिश (बाळा) मेश्राम यांनी ती तुमसर देवाळी ची असल्यांची खात्रीशीर माहीती काढल्या नंतर हितज्योती आधार फाऊंडेशन च्या सहकार्याने कन्हान पोलीस स्टेशन ला महिलेस योग्य आधार देण्याचे लेखी लिहुन देऊन तिला सावनेर ला नेऊन तिची परिस्थिती व्यवस्थित करून तिला कायम स्वरूपी सेवा संकल्प आश्रम बुलढाणा येथे ठेवण्याची व्यवस्था करून तिला चांगला आधार उपलब्ध करून दिला. या मनोरूग्ण महिलेच्या मदतीला रंजनिश वामन मेश्राम यांनी मौलिक कार्य केल्याबद्दल तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी द्वारे शिवपंचायत हनुमान मंदिर परिसर गांधी चौक कन्हान येथे रंजनीश मेश्राम यांचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलवार यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, पत्रकार कमलसिंग यादव, कन्हान कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरेशी, संस्था उपाध्यक्ष देविदास पेटारे आदीच्या हस्ते मौलिक मदत कार्य केल्याबद्दल रंजनिश (बाळा ) मेश्राम या मानवदुत युवकाचा शाल श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार अब्दुल काशिफ, ऋृषभ बावनकर, सतिश ढबाले, महेश ढोंगळे, संस्थेचे मिस्बाहऊर रहमान, नरेश शिंदे, ट्रेनीज अभय पेटारे, सौरभ पात्रे, रजनी खंडारे, नागपुरच्या सुनीता आदी उपस्थित होते.