कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ 

कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ 

कन्हान : –   शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांच्या मागणीस संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ. शितल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने डोणेकर सभागृह कन्हान येथे कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. 

         कन्हान शहर व परिसरात कोरोना च्या दुस-या लाटीमुळे गोर गरिबांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असुन कित्येक तरी लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि कन्हान पासुन नागपुर चे अंतर दुर असल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या अगोदर कित्येक तरी लोकांचा मृत्यु झाला. कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहातल्या काही सामाजिक कार्यकत्यासह संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे संचालक सौ. शितल मुकेश चौधरी व तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने सोमवार (दि.१७) मे २०२१ ला दुपारी १२ वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामा र्गावरील विजय मॉर्केट येथील डोणेकर सभागृह येथे कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई  आष्टणकर, नामनिर्देशित नगरसेवक नरेश बर्वे यांचा हस्ते व माजी जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर, कन्हान पोलीस स्टेशन थानेदारअरूण त्रिपाठी यांच्या उपस्थि तीत संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ कर ण्यात आला. या कोविडालायात १० ऑक्सिजन युक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली असुन डॉक्टर वसीम हुसैन व डॉ. सुष्मीता शहा यांच्या देखरेखीत हे कोविडालाय सुरू राहणार आहे. याप्रसंगी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे नगर सेवक राजेंन्द्र शेंदरे, माजी नगरसेवक अजय लोंढे, उदयसिंह उर्फ गज्जु यादव, आकीब सिद्धिकी, प्रविण गोडे, ॠषभ बावनकर, सौरभ डोणेकर, शुभम चौधरी, रोहित बर्वे सह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी

Wed May 19 , 2021
कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथील पोकलँड मशीन च्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोराने डिझेल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.         सोमवार (दि.१७) ला सकाळी ८.३० […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta