खंडाळा येथे विज पडुन शेतक-यांचा बैल ठार.
कन्हान : – परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊसा आल्याने खंडाळा (निलज) गावालगत असलेल्या कोठात विज पडुन बैल ठार झाल्याने खंडाळा (निलज) येथील शंकरराव वानखेडे या शेतक-याचे ऐन शेतीचा कामा च्या वेळी भंयकर नुकसान झाले आहे.
मंगळवार (दि.१८) ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान परिसरात अचानक आलेल्या अवकाळी वादळ, वार्यासह पाऊस येऊन खंडाळा (निलज) येथील शेतकरी शंकरराव महादेव वानखेडे यांच्या गावालगत असलेल्या कोठावर विज पडुन कोठात बांधुन असलेल्या बैलजोडीतील एका बैलाचा मुत्यु झाला. शेतकरी सकाळी बैलाची देखरेख करण्यास गेले असता एक बैल निर्जिव दिसल्याने लोकांना बोलावुन विचारपुस केल्यावर विज पडुन बैलाचा मुत्यु झाल्याचे लक्षात येताच संबधित अधिका-यांना माहीती दिली असता बुधवार (दि.१९) ला पशुवैद्यकीय अधिकारी वाळके मँडम व तलाठी क्षीरसागर हयांनी घटना स्थळी येऊन उत्तरिय तपासणी व पंचनामा करण्यात आला.
खंडाळा (घटाटे) ता पारशिवनी येथील शेतकरी शंकरराव वानखेडे हयांनी मागील वर्षीच ८० हजार रूपयांची बैलजोडी शेती कामाकरिता घेतली होती. परंतु शेतीची मसागत करून ऐन शेतीच्या महत्वाच्या कामाच्या सामोर अवकाळी पाऊसासह विज पडुन एक बैल ठार होऊन ४० हजार रूपयाचे नुकसान होऊ न त्वरित दुसरा बैल विकत घेतल्या शिवाय शेत काम न होता कुंटुबांच्या उदनिर्वाह चा प्रश्न उभा ठाकल्याने कोरोना महामारी संकट काळात म्हणजेच शेतक-याव र “दुष्काळात तेरा महिना ” सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रा प खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, प्रेमदास धरमारे, मनोहर गावंडे सह गावक-यांनी शेतकरी शंकरराव वानखेडे वर नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.