*उमरी (पाली)शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला*.
पारशिवनी (ता प्र):-तालुक्या तिल उमरी(पाली)येथे राहणारा शेतकरी शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला.पंकज शंकर भुरे वय ३५ रा.उमरी असे म्रुतकाचे नाव आहे.
ही घटना पारशिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमरी(पाली)येथील शेतात आज १७ जून शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली .घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटना ठिकाणी ठिय्या आंदोलन केले होते .मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पंकज भूर्रे दैनंदिन कामाप्रमाणे शेतात बियाणे सारण्या फाडण्याकरिता शेतात गेला होता . दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याचा स्पर्श जमिनीवर पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेस झाला. त्यातच करंट लागून तो घटनास्थळी मृत पावला . घटनेची माहिती लागलीच गावात व परिसरात पोहचली . हीच माहिती पारशिवनी पोलीसात व विद्यूत वितरण कंपणीला दिली. त्यावरून पारशिवनी चे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, पोउनि विनायक नागुलवार ,हेमंत रंगारी, गोपाल डोकरमारे,रुपेश राठोड ,संदीप व विद्युत विभागाचे रामटेक येथील उपविभागीय विद्युत अभियंता आशिष तेजे, घटनास्थळी दाखल झाले . यावेळी परिसरातील शेतकरी आकाश दिवटे, राधेश्याम नखाते , बंटी जैस्वाल , चंद्रशेखर राऊत , भुपेंद्र खोब्रागडे यासह अनेक शेतकरी,गावकरी मोठी संख्येत घटनास्थळी गोळा झाले . त्यांनी दोषी विदुयत अभियंता व लाईनमेनवर कार्यवाही करण्यात यावी तसेच मृतकाच्या परिवारास मोबदला देण्यात यावा अशी मागणी रेटून धरली . तीन तास आंदोलन चालल्यानंतर उपविभागीय विद्युत अभियंता आशिष तेजे यांनी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात येईल व मृतकाच्या परिवारास शासकीय नियमानुसार मोबदला देण्यात येईल असे लेखी आस्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले . त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला . पोलिसांनी मुतदेह उत्तरीय तपासणीकरिता पारशिवनी येथील ग्रामिन रुग्णालयात आणला . मृतकास तीन अपत्य म्हातारे आईवडील आहेत.पंकज हाच परिवाराचा कणा असल्यामुळे त्याचा परिवार दुर्बल झाला ..त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .सदर घटना विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याची परिसरात चर्चा आहे .पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे .
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
*पेंचकडे गेलेला विद्यूत पुरवठा सहा दिवसापूर्वी बंद करण्यात आला होता. मात्र दोन दिवसापूर्वी आलेलेल्या वादळात अशा विद्यूत खांबावरील कंडक्टर तुटल्यामुळे बंद विद्यूत प्रवाह तार शेतकऱ्यांच्या मोटारपंपावरील विद्यूत प्रवाहयुक्त तारेवर पडला. व काही भाग जमीनीवर पडला. त्यामुळे नकळत म्रुतकाचा अशा जिवंत तारेस स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना घडली*…..
हेमंत देशमुख ,शाखा अभियंता वि.वि.कंपनी मनसर
●●●●●●●●●●●
*बंद विद्यूत तार खाली पडून त्याला स्पार्किंगमुळे विद्यूत प्रवाह असल्याची माहिती कार्यालयाला प्राप्त झाली नाही. घडलेली घटना दुर्दैवी आहे. नियमाप्रमाणे कंपनीकडून म्रुतकाच्या कौटुबियास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल*……
आशिष तेजे
उपकार्यकारी अभियंता वि.वि.कंपनी, उपविभाग रामटेक