कन्हान शहरात २ लाख २१ हजारांची घरफोडी.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरी रोड अशोक नगर येथील रहिवासी ग.भा. रत्नमालाबाई तांडेकर यांच्या घराचा लोंखडी गेट व दरवाजाचा कोंडा तोडुन अज्ञात चोरांनी आत प्रवेश करून आलमारीतील सोन्याचे दागिने, चांदिचे सिक्के सह नगदी २५ हजार रू. असा एकुण २,२१,६६५ रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरेपीचा शोध घेत पुढील तपास करित आहे.
प्राप्त माहिती नुसार (दि.१४) जुन २०२१ ला दुपारी १:०० वाजता दरम्यान फिर्यादी ग.भा. रत्नमा लाबाई लक्ष्मणजी तांडेकर ही घराला कुलुप लावुन आपल्या मुलीच्या घरी गेली होती. ती गुरूवार (दि.१७ ) जुन ला घरी परत आली तर तिला घराचा लोंखडी चैनल गेटचे कुलुप तोडुन व लाकडी दरवाज्याची कुंडी तुटलेले दिसल्याने शेजारांनी बोलावुन पाहिले असता अज्ञात चोरांनी चॅनल गेटचे कुलुप व लाखडी दरवा ज्याची कुंडी तोडुन अवैधरित्या घरात प्रवेश करून बेडरुम मधील लोखंडी आलमारीचे लाॅकर मधुन सोन्याची पोत १६ ग्रॅम किंमत १६,४७५ रुपये, चैन ६.५ ग्रॅम किंमत २०,७२५ रुपये, आंगठी १.७ ग्रॅम किंमत ५६३० रुपये, आंगठी ३० ग्रॅम किंमत २४,६०० रुपये , दोन आंगठया ७ ग्रॅम किंमत २२,४१० रुपये, सोन्याची चैन ३० ग्रॅम किंमत १,०५,८२५ रुपये, चांदीचे सिक्के किंमत १००० रुपये, नगदी २५,००० रुपये असा एकुण २,२१,६६५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादी ग.भा. रत्नमालाबाई तांडेकर यांंच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार भागवान व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख पुढील तपास करीत आहे.