विसर्जनावरून कन्हानवासींचा नगरपरिषदेवर रोष
कन्हान, ता. १८ः
दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर विसर्जनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश असल्याचे सांगून नगरपरिषदेने केलेल्या व्यवस्थेत अनेक चुका असल्याच्या कारणावरून भक्तांनी रोष व्यक्त केला.
विसर्जनस्थळी लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त
कन्हान शहर व ग्रामीण भागामध्ये सातसे ते आठशे मोठया प्रमाणात गणपतीची स्थापना केली जाते. प्रत्येक वर्षी शासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कालीमाता घाटावर गणपतीचे विसर्जन केले जाते, मात्र यावर्षी काली माता घाट बंद केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सतरापूर येथे कृत्रिम वॉटर टँकची निर्मिती करून व दोन टैंक उपलब्ध करून देण्यात आले. विसर्जनासाठी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या अध्यक्ष करुणा आष्टणकर, योगेंद्र रंगारी, मुख्याधिकसी दीपक घोडके यांनी नगरपरिषदेकडून व्यवस्था केली होती.
१० फूट खोल कृत्रिम टैंक नगरपरिषद व्दारे तयार
पोलिस बंदोबस्त असल्याने काली घाटावर कृत्रिम टैंकमध्ये भाविकांना विसर्जन करता येत नव्हते. जेसीपीच्या सहाय्याने स्मशानभूमीला लागून माती खोदून १० फूट खोल कृत्रिम टैंक तयार करण्यात आले होते. यासाठी जीवनरक्षक पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाचा साह्याने भाविकांच्या हातून गणपती घेऊन त्या खोलगट खड्यात उतरून तहान मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. त्यामुळे पथकाचा सदस्य पायाखाली येत असल्याचे लोकांना आरोप होता. याकडे मुख्याधिकारी व कर्मचारी वर्गाचे दुर्लक्ष होते तर नगरसेवकांनी सुद्धा सूचना न केल्याचा आरोप होता. विसर्जन करत असताना कृत्रिम टैंक हे पूर्णपणे मातीने माखले होते. जीवनरक्षक पथकांबा पायाखाली गणपती येत असल्याने काही भाविक भावनात्मक होऊन कृत्रिम टँकमध्ये गणपती विसर्जन करायाला तयार नव्हते. त्यांनी गणपतीची विटंबना होत असल्याचे कारण पुढे करून नदीच्या पुलावरून मूर्ती नदीत सोडल्या तर काही लोकांनी साई मंदिरच्यामागून कामठी येथे येवून नदीच्या पात्रात गणपतीचे विसर्जन केले.
दिवस मावळत असल्याने गणपती विसर्जनासाठी लोकांची गर्दी होत असल्याने होताच लोकांनी नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाबदल नारेबाजी करून व्यवस्वेवर नाराजी व्यक्त केली.
सौ.करुणाताई आष्टणकर – न.प.नगराध्यक्षा
लोकांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. विसर्जन स्थळावरील जमीन धारकाची समती घेऊन जिल्हाधिकारींच्या आदेशानुसार दहा फुट खोल टॅंक तयार करून जिवन रक्षक पथकाचा साह्याने गणपती विसर्जन करण्यात आले होते. शिवाय दोन कृत्रिम टॅंक नगरपरिषद समोर व कालीमाता घाटावर लावण्यात आली होते.
दिपक घोडके- नप मुख्याधिकारी कन्हान
कृत्रिम टॅंकच्या परिसरात स्मशानभूमी असल्याची पूर्व कल्पना नव्हती. नदी, नाले दूषित न करता निसर्ग वातावरणात कृत्रिम टॅंक तयार करून त्या गणपतीचे विसर्जन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी शासकीय पत्रातून केले होते. त्यानुसार दहा मातीचे खोलीकरण करून गणपतीचे विसर्जन करण्यासाठी उपलब्ध करून दिले. मी उपस्थित असताना कुठलेही अनुचीत प्रकार घडला नाही. ज्यांच्या उपस्थितीत विसर्जन स्थळी काही कृत्यं झाले असल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
रविन्द्र पाटील – पोलीस निरीक्षक कन्हान
न्यायपालिकेचा जिल्हाधिकाऱ्यांना निसर्गाचे संवर्धन करण्याचे आदेश असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिल्याने बाप्पाच्या विसर्जन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त लावला असून आदेशाचे पालन करीत आहे. नगरपरिषदेने कृत्रिम टॅंकची व्यवस्था केली त्यात पोलिसांचा कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेत नाही. पोलिसांनी केलेल्या सूचनानुसार शांतपणे भाविक विसर्जन करीत आहे.