नेहरू युवा केंद्र नागपूर तर्फे सावनेर तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक यांचे संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जाहिरातीसाठी 7020602961

सावनेर : नेहरू युवा केंद्र नागपुर, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक नागपुर, तसेच नेहरू युवा केंद्र नागपूर तर्फे सावनेर तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक अविनाश नारनवरे, निरंजन राकस यांचे संयुक्त विद्यमानाने वार्ड क्रमांक एक पंचशील नगर, खापा रोड, सावनेर येथे दुपारी १२ ते ६ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सावनेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष एडवोकेट श्री. अरविंद लोधी तथा प्रमुख पाहुणे म्हणून युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रफुल्लभाऊ कापसे उपस्थित होते.


या शिबिरासाठी युवा नेते तुषार दादा गायकवाड,मयूर ठाकरे, शुभम निकोसे, संजय मेंढे, विजय कांबळे, शुभम गजभिये, संकेत कुर्वे, योगेश गजभिये, पवन मालवी, शुभम गमे, लोकेश गायकवाड, सुरज ढोके व पंचशील नगर मित्र परिवार यांनी मेहनत घेतली.
या शिबिराला रक्तदात्यांच्या चांगला प्रतिसाद मिळाला एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी चे पथक आवश्यक साधन सामुग्रीने उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र, बॅग. व चिक्की यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी

Sat Dec 19 , 2020
हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी #) कन्हान शहर विकास मंच चे राज्याचे गृहमंत्री  देशमुख साहेबाना पोलीस स्टेशन मार्फत निवेदन.  कन्हान : – नागपुर शहरातील काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्मा विरुद्ध सोशल मीडिया वर एक व्हिडियो वायरल केल्याने हिंदु धर्माचा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta