हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी
#) कन्हान शहर विकास मंच चे राज्याचे गृहमंत्री देशमुख साहेबाना पोलीस स्टेशन मार्फत निवेदन.
कन्हान : – नागपुर शहरातील काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्मा विरुद्ध सोशल मीडिया वर एक व्हिडियो वायरल केल्याने हिंदु धर्माचा अपमान केला असुन कन्हान शहर येथे कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबाना कन्हान पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागपुर शहरातील काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्माचा विरुद्ध एक व्हिडियो बनवुन सोशल मिडिया वर शेअर करुन हिंदु धर्माचा अपमान केला असुन अरबाज खान या ईसमा ने व्हिडियो मध्ये हिंदु धर्माचा महिलांना शिविगाळ केल्याने हिंदु धर्माचा लोकांचा आत्मसंन्मानाला ठेस पोहोचविण्याचे कार्य केले असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यानी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना कन्हान पोलीस स्टेशन थानेदार अरूण त्रिपाठी मार्फत निवेदन देत हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, सुषमा मस्के, हरीओम प्रकाश नारायण, सोनु खोब्रागडे , सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे, अमित भारद्वाज, मुकेश गंगराज सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.