” गणपती बाप्पा मोरया… मंगल मुर्ति मोरया” च्या जयघोषात बाप्पांचे आगमन
घरघुती व सार्वजनिक २९ गणेश मुर्तीची स्थापना करून गणेशोत्सावाचा शुभारंभ
कन्हान,ता.१९
“गणपती बाप्पा मोरया..मंगल मुर्ति मोरया ” च्या जयघोषात कन्हान शहर आणि ग्रामिण भागात भक्तानी सार्वजनिक मंडळ व घरोघरी श्री गणेशाचे आगमन झाले. विधिवत पूजा अर्चना करुन गणेश मुर्तीची स्थापना करून आनंदात गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
कन्हान शहरात आणि परिसरातील ग्रामिण भागात दरवर्षी प्रमाणे श्री गणेशोत्सव हा पुजा अर्चना, रंगारंग कार्यक्रम, विविध स्पर्धा सह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा श्री गणेश भक्त व नागरिकांत गणेशोत्सवाचा आनंदमय उत्साहाचे वातावरण दिसुन येत आहे.
शहर व ग्रामिण भागातील गाव, खेडयात घरोघरी व सार्वजनिक मंडळानी श्री गणेशाच्या आगमणाची पुर्व तयारी करुन मंगळवार (दि.१९) सप्टेंबर ला गणेश चतुर्थी च्या दिवसी ढोल ताश्यांचा, डी.जे च्या मधुरसुर नांदात, जयघोष करित नाचत गाजत गुलाल उधळुन ” गणपती बाप्पा मोरया….मंगल मुर्ति मोरया ” च्या गर्जनेत कन्हान शहरात १० आणि ग्रामिण भागात १९ सार्वजनिक मंडळानी व घरोघरी हजाराच्या वर श्री गणेशा, बाप्पाचे आगमन झाले.
विधिवत पूजा अर्चना करुन गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. सतत दहा दिवस गणेशोत्सव निमित्य सार्वजनिक मंडळ व घरोघरी गणेश मुर्तीची पुजा अर्चना करुन भजन कीर्तन, रंगारंग कार्यक्रमासह विविध कार्यक्रम करण्यात येणार असुन अनंत चतुर्दशीच्या दिवशी कन्हान नदी काठावर विसर्जन करून महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या महोत्सवात कुठल्या ही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन पोलीसांचा कडक, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनी दहा दिवस गणेशोत्सव धार्मिक सदभावना जपत शांततेत साजरा करण्याचे आवाहन कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी नागरिकांना केले आहे.
Post Views: 648
Wed Sep 20 , 2023
अवैद्यरित्या जनावरे कत्तलीकरिता वाहतुक करणारे दोन वाहन जप्त ४३ गौवंश जनावरा सह १४,१९,००० रू.चा मुद्देमाल जप्त, ५ आरोपीवर गुन्हा दाखल कन्हान,ता.१९ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस विशेष पथक नागपुर ग्रामिणच्या पथकाने कन्हान ते नागपुर कडे कत्तलीकरिता अवैद्यरित्या वाहतुक करताना सिहोरा शिवारात दोन पिकअप वाहनात निर्दयतेने आखुड दोराने पाय बांधुन कोंबुन […]