भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न
माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण
कन्हान, ता.२० डिसेंबर
कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा मालकीचा भुखंड विक्री झाल्याने शहराच्या विकासावर आणि मुलभूत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने, सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघ यांच्या वतीने गुरुवार (दि.22) डिसेंबर रोजी ते शुक्रवार (दि.30) डिसेंबर पर्यंत नगरपरिषद कार्यालय समोर साखळी उपोषणला सुरवात करण्यात येत असल्याची माहिती, माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
गेल्या कित्येक वर्षापासुन अनेक राजकीय आणि विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या भुंखडावर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, आठवळी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस थांबा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगर परिषद प्रशासनाने विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा भुंखड विकण्यात आला. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाला ? मागील कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महा मार्गावर फुटपाथ, गुजरी आणि आठवळी बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. विविध संघटने द्वारे अनेकदा नगर परिषद प्रशासना ला निवेदन देऊन ही प्रशासन झोपेतुन जागा न झाल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची भुंखड बाहेरील काही लोकांना विकण्यात आल्याने शहरातील सर्वांगीण विकासा वर आणि मुलभुत सुविधा वर आता प्रश्न निर्माण झाले आहे.
कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी भुखंडाची आवश्यकता आहे. या करिता राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना कन्हान शहरातील स्थानिक नागरिक, दुकानदार, शिक्षक, डाॅक्टर्स , सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांन कडून 10,000 पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहे . अशी माहिती माजी आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी, किशोर बेलसरे, लिलाधर बर्वे, रिंकेश चवरे, विनोद किरपान, शैलेश शेळके, चिराल वैध, प्रशांत पाटील, प्रदीप गायकवाड, मनोज काकडे, मयुर माटे, अभिजीत चांदुरकर, आदिसह दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Post Views: 748
Tue Dec 20 , 2022
माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न कन्हान, ता.२० डिसेंबर कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा मालकीचा भुखंड विक्री झाल्याने शहराच्या विकासावर आणि मुलभूत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने, सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार […]