रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य असल्याने मनुष्य वधाचा गुन्हयाची मागणी
कन्हान, ता. १९ डिसेंबर
कन्हान तारसा रोड वरील रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य बनलेला असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला असून जर का? त्यामुळे जीवित हानी झाली तर संबंधित व्यक्तिन वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे भाजपा तालुका अध्यक्ष, रिंकेशजी चवरे जिल्हा महामंत्री भाजपा योगेश वाड़ीभस्मे नागपुर ग्रा.यांच्या नेतृत्वात भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना निवेदन देण्यात आले.
या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, देवेन्द्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय पोलीस कार्यालय कन्हान, मुख्यधिकारी नगर परिषद कन्हान पिपरी यांना येथे कन्हान ते तारसा रोड वर ROB महारेल तर्फे तयार करण्यात आला आहे. ज्या प्रमाणे नियमा नुसार पूल अभियंता आणि शासना तर्फे तयार करण्यात आले होते. त्यात आणि आता ज्या प्रमाणे बनला आहे त्यात मोठी तफ़ावत आहे. शासकीय यंत्रनेद्वारे पाहाणी करुन त्याची सखोल चौकशी करावी. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी.
पुला मुळे कोणाची जीवीत हानी झाली तर स्थानीक शासन-प्रशासन, इंजीनियर-ठेकेदार, स्थानिक नेते, स्थानिक आमदार ज्यांनी पुल बनवता वेळी हस्तक्षेप केला. अशा सगळ्यानवर योग्य ती नियमानुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्मे, भाजपा जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपाण, कांद्री शहर अध्यक्ष मधेदेव चकोले, सौ पौर्णिमा दुबे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, सौ हर्षाली नागपुरकर जिल्हा मंत्री भाजपा महिला आघाडी, सौ संगीता खोब्रागडे जिल्हा पदाधिकारी, सुरेंद्र बुधे संपर्क प्रमुख भाजपा पारशिवनी तालुका, उमेश कुंभलकर अध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी पारशिवनी तालुका, लाखेश्वर वासाडे अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी पारशिवनी तालुका, भाजपा तालुका महामंत्री बीरेंद्र सिंह, शैलेश शेळके भाजपा तालुका उपाध्यक्ष, सौ मीणा कळम्बे भाजपा तालुका उपाध्यक्ष, अध्यक्ष विलास हुड भाजपा अध्यक्ष, चक्रधर आकरे, सौ अनिता पाटिल भाजपा तालुका पदाधिकारी, सौ सुषमा मस्के अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, महामंत्री साबरे, महामंत्री मयूर माटे, सौ प्रतीक्षा चवरे महामंत्री भाजपा महिला आघाडी, राजेन्द्र शेंदरे गट नेते कन्हान न.प, सौ वर्षा लोंढे सदस्य न.प कन्हान, सौ सुषमा चोपकर सदस्य, न.प कन्हान, मनोज कुरडकर, आकाश वाढ़नकर महामंत्री भाजप युवा मोर्चा, रोशन यादव ,सविता लीलारे, सुरेश कळम्बे, सौ सुलभा गनवीर, आशु गुप्ता, किरण ठाकुर, सौ मनीषा सिल्लारे, सौ रंजना वाघमारे, नीरज सिंह, नितिन ईखार, दीपंकर गजभिये, किशोर यादव, बबन बावने रंजीत पाटील, श्रीकांत पाटिल इत्यादि गावक़री, नागरिक, भाजप सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 793
Fri Dec 22 , 2023
*प्लॅनेट आयटी विदर्भ पूर्व विभागातील उत्कृष्ट उद्योजक गौरव पुरस्काराने सन्मानित.* *हा पुरस्कार MKCL च्या 13 व्या वार्षिक प्रादेशिक परिषदेत प्रदान करण्यात आला* सावनेर : नुकतीच MKCL ची 13 वी वार्षिक प्रादेशिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील 650 प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला एमकेसीएल […]