Home महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज: प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती

ब्रेकिंग न्यूज: प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती

0
659
मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांमध्ये सध्याच्या राजकीय परिष्थितीत प्रफुल्ल पटेल यांची पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आली आहे. मात्र, ट्विट करून प्रफुल पटेल यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.

या नेमणुकीबद्दल केंद्रीय नेत्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस आता एकही एकत्रित पक्ष म्हणून काम करत असून, प्रफुल्ल पटेल हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुढे आले आहेत. सर्व प्रमुख नेत्यांनी आणि सहकार्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, असे वक्तव्य समोर आले आहे.

सध्याच्या घडामोडींचा पार्श्वभूमी असा की, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी निधन झाल्यानंतर पक्षात नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांना पार्टीचे सर्वोच्च पद सोपवले गेले आहे.

राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया सुरु असून काही नेत्यांनी या नियुक्तीवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पटेलांचे ट्विट, राष्ट्रीय अध्यक्ष नाही

या सर्व वृत्ताचा मात्र प्रफुल पटेल यांनी ट्विट करून इंकार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही लोकशाही संस्था असून यात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात. माझ्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.