Home महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी! ; हप्ता बंद झाला असेल तर...

लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी! ; हप्ता बंद झाला असेल तर घाबरू नका

0
58
— e-KYC दुरुस्तीसाठी मिळाली नवी संधी; 31 मार्च 2026 पर्यंत वेळ

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ज्या पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC केली होती, मात्र त्यामध्ये काही तांत्रिक किंवा पर्याय निवडताना झालेल्या चुकांमुळे त्यांचा मासिक हप्ता बंद झाला होता, अशा महिलांना आता पुन्हा एकदा e-KYC दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत लाभार्थी महिला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून e-KYC मध्ये आवश्यक दुरुस्ती करू शकणार आहेत.

काय आहे लाडकी बहीण योजना?

ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये थेट जमा केले जातात.

e-KYC मुळे हप्ता का बंद झाला?

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने e-KYC बंधनकारक केली होती. मात्र,

  • अनेक महिलांनी e-KYCच केली नाही

  • काही महिलांनी e-KYC केली, पण चुकीचा पर्याय निवडला

  • आधार, बँक किंवा वैयक्तिक माहितीत त्रुटी राहिल्या

यामुळे अनेक लाभार्थी महिलांचा हप्ता बंद करण्यात आला होता.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे म्हणाल्या,

“e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः ज्या बहिणींनी e-KYC करूनही अद्याप पैसे मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी देण्यात येत आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर e-KYC दुरुस्ती करता येईल. सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा हीच विभागाची प्रामाणिक भूमिका आहे.”
लाभार्थी महिलांनी काय करावे?

✔️ ज्यांचा हप्ता e-KYC चुकांमुळे बंद आहे
✔️ त्यांनी अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन
✔️ ३१ मार्च २०२६ पूर्वी e-KYC मध्ये आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी

यामुळे बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.