Home निवडणूक 2026 चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विजयी; एका मताने काँग्रेसचा पराभव

चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विजयी; एका मताने काँग्रेसचा पराभव

0
151
चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी एका मताच्या फरकाने विजय मिळवत महापौरपदावर कब्जा केला. खांडेकर यांना एकूण 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 मते मिळाली.

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अलिप्त राहिले, तर एमआयएमचा एकमेव नगरसेवक तटस्थ राहिला. त्यामुळे मतांची सरशी अत्यंत थरारक झाली. अखेर भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याच्या जोरावर महापौर पद जिंकण्यात यश मिळवले.

महापौर पदाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदानाच्या शेवटपर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार रणनीती आखण्यात आली होती. मात्र निर्णायक क्षणी मिळालेल्या एका अतिरिक्त मतामुळे भाजपच्या संगीता खांडेकर यांनी विजय मिळवत महापौरपदावर आपली छाप उमटवली.

या विजयामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या विजयानंतर जल्लोष करत संगीता खांडेकर यांचे अभिनंदन केले. तसेच शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास नव्या महापौरांनी व्यक्त केला.