Home क्रीडा जवाहर विद्यालय वाकोडी मध्ये तीन दिवसीय योग शिबीर उत्साहात संपन्न

जवाहर विद्यालय वाकोडी मध्ये तीन दिवसीय योग शिबीर उत्साहात संपन्न

0
57
जवाहर विद्यालय वाकोडी मध्ये तीन दिवसीय योग शिबीर उत्साहात संपन्न
योगा करताना विद्यार्थी

सावनेर : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि अभ्यासात एकाग्रता वाढावी, या उद्देशाने जवाहर विद्यालय वाकोडी मध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 26, 27 ,28 फेब्रुवारी 2026 ‘तीन दिवसीय योगा, प्राणायाम व ध्यान शिबिराचे’ आयोजन आर्ट ऑफ लिविंग कृत उत्कर्ष योगा व मेध योगा या माध्यमातून करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 150 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
​शिबिराच्या पहिल्या दिवशी योगासनांचे महत्त्व सांगून सूर्यनमस्कार आणि मूलभूत आसन तसेच “सुदर्शन क्रिया” यांचा सराव घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी प्राणायामाच्या विविध प्रकारांद्वारे श्वसनावर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी ध्यानाद्वारे (Meditation) मनाची शांती आणि एकाग्रता कशी वाढवावी, याचे प्रात्यक्षिक करून पालकांनाही आमंत्रित करण्यात आले.
​आर्ट ऑफ लिविंग तज्ञ मार्गदर्शक सन्माननीय जानकी कुळकर्णी दीदी, वैजयंती पेशकर दीदी, सुनीता नारखेडे दीदी व सोनल स्वान दीदी यांनी विद्यार्थ्यांना वयानुरूप योगासनांचे धडे दिले.
​प्राणायाम सत्रामध्ये भस्त्रिका, भ्रामरी, नाडीशोधन यांसारख्या क्रियांवर भर देण्यात आला. पाचवी ते नऊ वीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास केला.
​शाळेचे मुख्याध्यापक श्री मदन डाहाके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी योग ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केवळ या तीन दिवसांपुरते मर्यादित न राहता दररोज योगाभ्यास करावा.”
​या शिबिराच्या यशस्वीततेसाठी सहाय्यक शिक्षक श्री सुरेंद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here