कन्हान येथे कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर
कन्हान,ता.22
कन्हान युथ फाउंडेशनच्या वतीने कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार, २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वैष्णवी मंगल कार्यालय, कन्हान येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभाग नागपूरचे प्रा. उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात विविध शासकीय विभागांतील अधिकारी मार्गदर्शन करणार असून शासनाच्या विविध योजनांची माहिती, कौशल्य विकास, उद्योजकता, स्वरोजगार, कर्ज योजना तसेच महिला बचत गटांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
शिबिरात समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य अपंग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, एमसीईडी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती-भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.








