पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान : – जम्मु – कश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० ते ४४ जवान शहिद झाले होते. या अत्यंत निंदनीय घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे श्रद्धांजली अर्पण केली.
दि.१४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मु-काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात जम्मु श्रीनगर राष्ट्रीय महामार्गा वरील लेथापोरा या अवंतीपोरा जवळ केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर दुपारच्या सुमारास ३ वाजुन १५ मिनटांनी एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहना सकट हल्ला केल्याने भारतीय सीआर पीएफ चे ४० ते ४४ जवान शहिद झाले होते. रविवार (दि.१४) ला कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिका र्यांनी तारसा रोड शहिद चौक येथील शहिद स्मारका वर पुष्पहार, पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधा रण करित पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या वीर जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृष भ बावनकर, सचिव प्रदीप बावने, सहसचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, सोनु खोब्रागडे, प्रका श कुर्वे, सुषमा मस्के, प्रविण माने, निलकंठ मस्के, अखिलेश मेश्राम, दिपचंद शेंडे, शाहरुख खान सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.