“हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे कौतुक
भीम शाहीर प्रदीप कडबे यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार
कन्हान,ता.२१ फेब्रुवारी
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी नुकतेच विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तिन अंकी संगीत नाटक “हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी भरपूर कौतुक केले आणि श्रोते मंत्र मुगद्य झाले.
रामटेक विधानसभा क्षेत्राचे कॉग्रेस नेते चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे भीम शाहीर प्रदीप कडबे यांचे शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. प्रसंगी वयोवृद्ध कलावंतांचे सत्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल बावनकर, माजी आमदार चरण वाघमारे, कार्यक्रमाचे आयोजक शाहीर राजेंद्र बावनकुळे, केंद्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ, कामठी, शाहीर गणेशराम देशमुख, सर्वस्तरिय कलाकार संस्था तुमसर, शाहीर वसंता कुंभरे, करंट कलाकार संस्था लाखनी, सर्वश्री शाहीर भगवान लांजेवार, अरुण मेश्राम, चिरकुट पूंडेकर, गजानन वडे, भीम शाहीर प्रदीप कडबे, शिशुपाल अतकरे, भगवान वानखेडे, मधुकर शिंदेमेश्राम, महादेव पारसे, रायबान करडभाजने, वासुदेव नेवारे, श्रावण लांजेवार, चंद्रकला गिरहे, कृष्णा वानोडे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 720
Mon Feb 27 , 2023
सावनेर : सावनेर येथील एका 25 वर्षीय पियुष सावनकर युवकाने खेडकर ले आऊट येथिल स्वतःच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ही धक्कादायक घटना रविवार रात्री अंदाजे 10.30 चा दरम्यान घडली, याबाबत घटनेची माहिती परिसरात राहणारे लोकांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली, लगेच त्यांनी सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळक […]