हुजूर मरियम अम्मा यांचा १०६ वा वार्षिक उर्स साजरा
कन्हान,ता.२० मे
हुजूर मरियम अम्मा साहेबा (र.अ) गाडेघाट जुनीकामठी ता.पारशिवनी जि.नागपुर येथे १०६ वा वार्षिक उर्स निमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठया उत्साहाने वार्षिक उर्स साजरा करण्यात आला.
नागपुर जिल्हयातील गाडेघाट, जुनीकामठी ता. पारशिवनी येथील प्रसिध्द अम्मा दर्गा येथे हुजूर मरियम अम्मा साहेबा (र.अ.) १०६ व्या वार्षिक तीन दिवसीय उर्स ची सुरूवात बुधवार (दि.१७) मे २०२३ ला रात्री ९ वाजता मिलाद शरीफ कार्यक्रमाने करण्यात आली. गुरूवार (दि.१८) मे ला दुपारी १ वाजता अम्मा दर्गा येथुन शाही संदल शरीफ काढुन कन्हान रेल्वे स्टेशन परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन औलिया (र.अ.) ताजाबाग नागपुर येथुन आलेल्या शाही संदल चे मिलन होऊन दोन्ही शाही सदल गहुहिवरा चौक ते तारसा रोड चौक भ्रमण करित बाबासाहेब आंबेडकर चौकातुन ते गाडेघाट अम्मा दर्गा येथे पोहचला. शाही संदल मध्ये अश्व पथक, बँड, ढोल पथक व विविध सजावट आकर्षणाचे केंद्र होते. कन्हान येथील प्रमुख मार्गावर विविध ठिकाणी शाही संदल मध्ये सहभागी भाविकांना शरबत, मिष्ठान व पानी वितरण करून स्वागत करण्यात आले. भ्रमण करीत सायंकाळी ६ वाजता परचम कुशाई नंतर अम्मा दर्गाचे सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, सज्जादा नशीन ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत चादर चढवुन रात्री ८ वाजता सुप्रसिध्द कव्वाल यांनी कव्वाली चा कार्यक्रम सादर करून श्रौत्यांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवार (दि.१९) मे ला सकाळी ९ वा जता कुल शरीफ ने वार्षिक उर्स ची सांगता करण्यात आली. तीन दिवसीय हुजूर मरियम अम्मा यांचा १०६ व्या वार्षिक उर्स कार्यक्रम हुजूर अम्मा साहेबा ट्रस्ट, ताजाबाद ट्रस्ट, ताजाबाद खुद्दाम ट्रस्ट, फ़ैज़आने ताजुल औलिया कमेटी, वाकी दरबार ट्रस्ट, पागलख़ाना दरबार ट्रस्ट,काबुल कंधार दरबार ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुख मान्यवरांच्या सहकार्याने उर्स उत्साहाने साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावत उपस्थित राहुन वार्षिक उर्स चा लाभ घेतला. कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर, सपोनि दिलीप पोटभरे व खुफिया विभाग आतिश मानवटकर सह पोलीस कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Post Views: 784
Mon May 22 , 2023
नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुषण मुक्ती करिता लढा लढणार – आदित्य ठाकरे कन्हान,ता.२२ मे नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषण पासुन मुक्त करे पर्यंत लढा लढणार असे […]