आता ३० वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण सुरू
कन्हान : – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नियमित कोव्हीड- १९ प्रादुभाव रोखण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना निशुल्क लसीकरण मोहीम राबवुन लस लावणे सुरू असुन शनिवार (दि.१९) जुन २०२१ पासुन ३० वर्षा वरील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे कोव्हीड-१९ लसीकरण मोहीमे अंतर्गत लस लावणे सुरू झालेले असल्याने कन्हान-पिपरी नगररिष द अंतर्गत शहरातील सर्व ३० वर्षावरील नागरिकांनी आणि ४५ वर्ष व त्यावरील ज्या नागरिकांनी आता पर्यंत लस लावली नाही अश्या सर्व नागरिकांनी प्राथ मिक आरोग्य केंद्र, कन्हान येथे आधारकार्ड किंवा ओळख पत्र व मोबाईल क्रंमाक सोबत घेऊन जावुन मोफत कोव्हीड-१९ लसीकरण करून घ्यावे असे
आवाहन नगरपरिषद कन्हान-पिपरी चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे हयांनी केले असुन कोव्हीड- १९ लसीकरणा बाबत काही अडचणी आल्यास १) कार्यालय अधिक्षक- सुशांत नरहरे मो न ८३२९६२४१ ४६ , २) शहर समन्वयक – संकेत तालेवार मो न ९१५८७८६६७२, ३) लेखापाल- पंकज खवसे – ८७६६७३५६७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.