कन्हान परिसरात ६९३ नागरिकांचे लसीकरण
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १२९ व जे एन दवाखाना कांद्री ८९ आणि टेकाडी कोळसा खदान आंढणवाडी क्र ६
येथील शिबीरात १४६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे बनपुरी, डुमरी कला व साटक येथे ३२९ असे कन्हान परिसरात एकुण ६९३ लोकांना लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे शनिवार (दि.१९) पासुन ३० वर्ष व त्या वरील वयाच्या नागरि कांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आले असुन या अंतर्गत सोमवार (दि.२१) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १२९ व वेकोलि जे एन दवाखाना कांद्री ला ८९ आणि ग्रा प टेकाडी (कोख) आंगणवाडी क्र ६ येथील शिबीरात १४६ असे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३६४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे बनपुरी, डुमरी कला येथील शिबीर व साटक असे ३२९ नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ६९३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कन्हान परिसरातील ३० वर्ष व त्यावरील जास्तीत जास्त नागरिकांनी त्वरित लसीकऱण करून घ्यावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे.