आष्टे डु जिल्हा क्रिडा स्पर्धेत जय भवानी दाणपट्टा विजापुर (खंडाळा) चे सुयश
कन्हान,ता.२१ ऑगस्ट
१८ वी आष्टेडु मर्दानी आखाडा नागपुर जिल्हास्तरिय स्पर्धा रामटेक येथे घेण्यात आल्या. जय भवानी दाणपट्टा आखाडा विजापुर (खंडाळा) च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत सुर्वण पदक, रजत पदक व कास्य पदक आणि प्रोत्सहानपर पुरस्कार प्राप्त करून गावाचे नावलौकिक केले.
विजापुर (खंडाळा) येथील सागर नवघरे या तरूणाने मा.राजेंद्र मुळक सहायता कक्षा व्दारे जय भवानी दाणपट्टा आखाडा विजापुर (खंडाळा) ला साहित्य मिळवुन गावातील मुलामुलींना अखाडा चे प्रशिक्षण देऊन यशाची पायरी गाठण्यास रामटेक येथे नुकतेच पार पडलेले. १८ वी आष्टे डु मर्दानी आखाडा जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत स्वखर्चाने विद्यार्थ्याना नेऊन व त्यांची प्रवेश फी भरून आष्टेडु जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेत सहभागी केले. १५ वर्ष वयोगटात मोहित रमेश मेश्राम याने सुर्वण पदक, कु वृंदा लक्ष्मण उके हिने रजत पदक तर १२ वर्ष वयोगटात हर्षल अशोक बोन्द्रे याने कास्य पदक प्राप्त केले. प्रज्वल नवघरे, क्रिश केडेकार, रोहित तुरणकर, वेदांत कांबळे या विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. तसेच आखाडा प्रशिक्षक सागर नवघरे यांनी मौलाचे कार्य करित संधीच सोन केल्याने त्याना सुध्दा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशा बद्दल ग्रामस्थांनी आखाडा प्रशिक्षक सागर नवघरे व विजयी विद्यार्थ्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
Post Views: 733
Tue Aug 22 , 2023
नवेगांव खैरी पेच धरणाचे दोन वक्रद्वार ०.१५ मी.उघडले पेंच, कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी – सावरकर कन्हान,ता.२२ ऑगस्ट पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज मंगळवार ला सकाळी ६ वाजता पर्यंत धरणात १०० टक्के जलसाठा झाल्याने दुपारी धरणाचे दोन वक्र द्वार उघडुन […]