कामठी वकील संघावर ॲड.डी.सी.चहांदे यांचे निर्विवाद वर्चस्व अध्यक्षपदी ॲड.अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड.प्रवीण गजबे विजयी

कामठी वकील संघावर ॲड.डी.सी.चहांदे यांचे निर्विवाद वर्चस्व

अध्यक्षपदी ॲड.अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड.प्रवीण गजबे विजयी

नागपूर,ता.२० 

       नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी, अग्रणी आणि प्रतिष्ठित असलेल्या कामठी वकील संघावर ॲड.डी. सी.चहांदे यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम केले आहे.

     कामठी वकील संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड.अविनाश भिमटे यांनी प्रतिस्पर्धी ॲड.महेश फालेकर यांचा तब्बल ६७ मतांनी पराभव केला.  उपाध्यक्षपदी ॲड.प्रिया मेश्राम आणि सचिवपदी ॲड.प्रवीण गजबे अविरोध निवडून आले आहे. तर सहसचिव पदी ॲड.बासित नियाज हैदरी हे विजयी झाले.

   कार्यकारी सदस्यांच्या पाच जागेवर ॲड.डी.सी. चहांदे यांच्या पॅनलचेच ॲड.रीना गणवीर, ॲड.भीमा गेडाम, ॲड.मृणाल भेलावे, ॲड.परीक्षित यादव आणि ॲड.मनोज शर्मा विजयी झाले आहे. ॲड.डी.सी.चहांदे हे तब्बल २० वर्षे कामठी वकील संघाचे अध्यक्ष होते. आणि आता प्रथमच त्यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.अरुण रामटेके, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.भूषण तिजारे, ॲड. राजन सोनेकर, ॲड.माधुरी बेलेकर यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भुजलिया निमित्ताने रामटेक शहरात भव्य मिरवणुक चंद्रपाल चौकसे यांच्या समाजबांधवांना प्रेमाचा व एकतेचा संदेश 

Wed Aug 21 , 2024
भुजलिया निमित्ताने रामटेक शहरात भव्य मिरवणुक चंद्रपाल चौकसे यांच्या समाजबांधवांना प्रेमाचा व एकतेचा संदेश  कन्हान,ता.२०     रामटेक नगरपरिषद अंतर्गत शीतला माता मंदिर, रामटेक येथे (दि.२०) ऑगस्टला मंगळवार कहार, भोई, किराड, ढीवर व सुदर्शन समाज (हिंदी भाषिक) तर्फे भुजलिया (कजलीया) विसर्जनाच्या कार्यक्रमाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे अध्यक्ष […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta