भुजलिया निमित्ताने रामटेक शहरात भव्य मिरवणुक चंद्रपाल चौकसे यांच्या समाजबांधवांना प्रेमाचा व एकतेचा संदेश 

भुजलिया निमित्ताने रामटेक शहरात भव्य मिरवणुक

चंद्रपाल चौकसे यांच्या समाजबांधवांना प्रेमाचा व एकतेचा संदेश 

कन्हान,ता.२०

    रामटेक नगरपरिषद अंतर्गत शीतला माता मंदिर, रामटेक येथे (दि.२०) ऑगस्टला मंगळवार कहार, भोई, किराड, ढीवर व सुदर्शन समाज (हिंदी भाषिक) तर्फे भुजलिया (कजलीया) विसर्जनाच्या कार्यक्रमाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते

चंद्रपाल चौकसे अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य, पर्यटक मित्र यांनी भेट दिली.  

    यावेळी स्व.जतीराम बर्वे यांचा फोटोल पुष्पगुच्छ, माल्यार्पण व अभिवादन करून भूजलिया विसर्जनासाठी समाजबांधवांनी संगीतमय वातावरणात ढोल-ताशा, संदल, घोडे सह भव्य मिरवणुक काढून रामटेक शहरात भ्रमण केले. प्रसंगी चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले की, भुजलिया काढण्याचे उद्देश समाजात भाईचारा निर्माण व्हावा, समाजाची रूढी परंपरा व एकता कायम रहावी याकरिता दरवर्षी भुजलिया उत्सव मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्रित होऊन काढण्यात येतो. 

     या मिरवणुकीला पि.टि.रघुवंशी, बबलू दूधबर्वे, अशोक बर्वे, बिकेंद्र महाजन, मोहन कोठेकर, वसंता अहिरकर, अनंतराम चंदनबटवे, कवडू बर्वे, माणिक ताकोद, अशोक रघुवंशी, रती रघुवंशी, सौ.श्वेता दूधबर्वे, सौ.स्वाती रहिकवार, सौ.अनुबाई चंदनबटवे व नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी गठीत.. अतुल पाटील अध्यक्ष तर दिनेश दमाहे सचिव पदी

Fri Aug 30 , 2024
सावनेर व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी गठीत.. अतुल पाटील अध्यक्ष तर दिनेश दमाहे सचिव पदी सावनेर – 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी झालेल्या सावनेर व्यापारी संघाच्या बैठकीत सर्व सावनेर व्यापारीच्या सहमतीने नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद व्यापारी संघाचे निवृत्त अध्यक्ष विनोद जैन यांनी भूषवले, आणि सचिव मनोज बसवार यांनी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta