कन्हान पोलीसावर प्राणघातक हमल्याचे आणखी दोन आरोपी अटक
#) कन्हान पोलीसांना तपासा करिता चारही आरोपींचा २३ पर्यत पीसीआर
कन्हान : – पोलील जमादार रविंद्र चौधरी वर प्राणघातक हमल्या प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शोध घेत गुरूवार ला मध्यरात्री दोन आरोपींना अटक केली , तर शनिवारी रात्री आणखी दोघांना अटक केली. न्यायाधिशाने चार आरोपीना पुढील तपासाकरिता (दि २३) पर्यंत चार दिवसाचा पी सी आर मिळाला.
प्राप्त माहीतीवरून सोमवारी रात्री सिहोरा रेती घाटातुन वाळु चोरी करण्या-या ट्रॅक्टरवर कन्हान पोलीसांनी कार्यवा ही करित कमलेश मेश्राम च्या भावाला अवैध रेती चोरी प्रकरणी रात्री चोप दिली व प्रतिबंधक कारवाई केल्याचा वचका काढण्याकरिता कट रचुन गहुहिवरा चौकाजवळ तारसा रोडवरील खंडेलवाल यांच्या घराजवळ पोलीस जमादार रविंद्र चौधरी यांच्यावर प्राणघातक हमल्ला करून गंभीर जख्मी केल्याने आरोपी कमलेश मेश्राम, अमन खान व सोबती असे चार आरोपी विरूध्द कन्हान पोलीसानी कलम ३०७, ३५३, ३३३, ३४ भादंवि ४/ २५ आरम अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करून पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजल्लवार, स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा पोलीस निरिक्षक अनिल जिट्टावार यांचे पथक व पोलीसांनी आरोपीचा शोध घेत गुरूवारी मध्यरा त्री १.३० वाजता रामटेक परिसरातुन आरोपी कमलेश हरिश्चंद मेश्राम वय ३० वर्ष , अमन अनवर खान वय २० वर्ष दोन्ही रा. कन्हान यांना अटक करून कामठी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशाने दोन्ही आरोपीना एमसीआर दिला होता. पोलीसांनी शनिवार (दि १९) आरोपी नितेश मेश्राम व कपिल रंगारी यास अटक केली. गुन्हयाचा तपास करण्याकरिता आरोपी कमलेश मेश्राम व अमन खान हयांना कन्हान ला आणुन रविवार (दि.२०) ला कामठी न्यायालयात हजर करून गुन्हयाच्या योग्य तपासाकरिता पीसीआर मांगितल्याने न्यायाधिशाने चार ही आरोपीचा (दि.२३) पर्यंत चार दिवची साचा पीसीआर मिळवुन कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजल्लवार गुन्हयाचा पुढील सखोल तपास करित आहे.