नितीन गडकरी येताच पुलावर उजेड, जाताच अंधाराचे साम्राज्य
कन्हान नदीचा पुलावरील पथदिवे नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी
कन्हान,ता.20 सप्टेंबर
कन्हान नदी वरील नवीन पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुलावर लावलेले पथदिवे मागील काही दिवसांपासून पासुन बंद पडले. पुलावर सर्वत्र काळोक पसरून अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी न.प.मुख्याधिकारी सौ.अर्चना मेंढे यांना नवीन पुलावरील पथदिवे प्रकाशमान नियमीत सुरू ठेवण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
कन्हान शहरातील नदीवरील पूलाचे बांधकाम ५०.६३ कोटी रुपयाने करण्यात आले. पुलावर दोन्ही राष्ट्रीय महामार्ग पथदिवेची व्यवस्था करण्यात आली आहे. या नवीन पुलाचे लोकार्पण याच महिन्यात १ सप्टेंबर 2022 रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आल्याने पुला वरुन रोज दिवस – रात्र सर्व प्रकारचे वाहनाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु झाली. पुलावर लावलेले पथदिवे हे काही दिवसांन पासुन बंद पडल्याने पुलावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. कन्हान पोलीस स्टेशन समोरील मनसर कडुन येणाऱ्या वाहन चालकांना उजवीकडे वळण हे अपघातास निमंत्रण देत असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . काही दिवसांपूर्वी एक दुचाकी वाहन चालक मनसर कडुन नागपुरला जात असतांना पोलीस स्टेशन समोरील वळणावर चालकास वाहना वरील वेग नियंत्रणात करता आले नसल्याने, वाहन चालक वाहनासह रोडावर खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने रोडावर वाहन नसल्याने कुठली ही जीवीत हानी झाली नसुन मोठा अनर्थ टळला. कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या नेतृत्वात न.प.मुख्याधिकारी सौ.अर्चना मेंढे यांना पथदिवे नियमित सुरु ठेवण्याची आणी अपघातावर निमंत्रण देणाऱ्या वळणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, मार्गदर्शक भरत सावळे, हरीओम प्रकाश नारायण, आकाश पंडितकर आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते .
नितिन गडकरी येताच पुलावर उजेड …..जाताच अंधाराचे साम्राज्य
कन्हान नदी वरील नवीन पुलाचे लोकार्पण भव्य दिव्य पथदिवे मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पाडले. यानंतर पुलावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे .सुत्राचां माहितीनुसार पुलाचे लोकार्पण दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी महा.विद्युत केंद्राकडून पैश्याने विद्युत विकत घेऊन देखावा करुन पुला वरील पथदिवे सुरु करून पुलाचे लोकार्पण नितिन गडकरी यांच्या हस्ते केले.त्यानंतर नितिन गडकरी निघुन जाताच या नवीन पुलावर चे पथदिवे बंद पडुन अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता ठाकरे यांच्याशी संपर्क करुन पथदिवे बंद बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, कि काही बिघाड आल्याने पथदिवे बंद करुन ठेवले आहे व पथदिवे सूरू करण्याचे कार्य सुरु असुन येत्या दोन ते तीन दिवसात नवीन पुला वर चे पथदिवे सुरु होतील असे त्यांनी आश्वासन दिले .
Post Views: 779
Thu Sep 22 , 2022
क्रांन्दी येथे विद्यार्थी समाधान व राजस्व भव्य शिबिर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करावे – तहसीलदार प्रशांत सांगळे कन्हान, ता.22 सप्टेंबर जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबिर स्थळाची व तयारीची पाहणी […]