पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
गणेश विसर्जनाच्या स्थळी घाटाची पाहणी व पोलीसांना सुचना
कन्हान, ता. २१
पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील गणपती स्थापना बंदोबस्ताचा आढावा घेत कन्हान नदी काठावरील काली माता घाटावर विसर्जन स्थळाची पाहणी केली.
मंगळवार (दि.१९) सप्टेंबर २०२३ पासुन मोठया उत्साहात सर्वत्र सन २०२३ चा सार्वजनिक गणेशोत्स व साजरा होत आहे. यामध्ये नागपुर ग्रामिण पोलीस दला कडुन सार्वजनिक गणपती उत्सव आनंदात साजरा होण्याकरिता चोख बंदोबस्ताची विशेषत: पुर्व तयारी करण्यात आली. (दि.१९) रोजी नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष ए.पोद्दार (भापोसे) यांनी पोस्टे कन्हान येथील बंदोबस्ताचे ठिकाणी भेट दिली.
कन्हान नदीचे काठावरील काली माता मंदीर घाटाच्या विसर्जन स्थळी कन्हान तसेच कामठी, नागपुर शहर हद्दीतील भाविक मोठया प्रमाणात गणपती विसर्जन कराला येतात. पोलीस अधिक्षक यांनी येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. चोख बंदोबस्ता बद्दल कन्हान पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले. लहान गणपतींना कृत्रिम तलावात विसर्जित करावे व शासना कडुन समन्वय साधुन गणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव तयार करून घ्यावे याबाबत सुचना दिल्या.
Post Views: 698
Fri Sep 22 , 2023
विभागिय कुस्ती स्पर्धेत समिर महल्ले विजयी, राज्यस्तरिय स्पर्धेत प्रवेश कन्हान, ता.२१ सेट केसरीमल पोरवाल कनिष्ट महाविद्यालयचा विद्यार्थी व केरडी व्यायाम शाळेचा खेडाळु समिर महल्ले यांनी विदर्भस्तरिय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकावित कोल्हापुर येथे होणार राज्यस्तरिय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी […]