पारशिवनी येथील जबरी चोरी टोळी चे पाच आरोपी सह ३,४०,१००चे मुद्देमाल स्थानिय गुन्हे शाखेचे पथकाने केले जेरबंद
कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत ईटगाव कडे जाणारे तक्रारर्कता फिर्यादी प्रदीप अभिमन्यू साखरे वय २८ राहणार वार्ड क्रमांक २ चणकापूर खापरखेडा तालुका सावनेर जिल्हा नागपूर हे दिनांक १७/१२ /२० रोजी त्यांचे इतर २ मित्रासह खापरखेडा वरून त्यांचे होंडा सिटी कारने जात असताना रात्रीचे दहा वाजताच्या दरम्यान कन्हान नदी चे पुलाजवळ पारडी शिवार येथे हे तीन अज्ञात इसमांनी एक्टिवा दुचाकीवरून येऊन फिर्यादीची अडवणूक करून चाकूचा धाक दाखवून प्रदीप अभिमन्यू साखरे जवळील सोन्याची ची चैन ,सोन्याचे ब्रेसलेट,दोन अंगठी ,मोबाईल तीन लाखा पेक्षा अधिक किमती चे मुद्देमाल जबरी चोरून नेल्याची घटना घटली होती त्या .संबंधाने पारशिवनी पोलिस स्टेशन चे निरिक्षक संतोष वैरागडे यांनी अपराध क्रमांक ३१६/२० ने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनेची गांभीर्याने पाहता राकेश ओला पोलीस अधीक्षक नागपूर नागपूर ग्रामीण यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिंटावार यांना जबरी चोरी करणारे गुन्हेगारांना जेरबंद करण्याबाबत आदेश दिले त्याप्रमाणे गु न्हे शाखे ने एक पथक तयार करीत मागील तीन दिवसापासून आतापर्यंत परिश्रम घेऊन गुन्ह्यातील आरोपी एक १)रमेश रामकिसन रविदास वय ३१ राहणार वार्ड क्रमांक ३ चणकापूर खापरखेडा यास ताब्यात घेऊन गुन्हा संबंधाने सखोल विचारपूस केली असता त्याने माहिती दिली कि त्यांचे इतर साथीदार नावे २)शहजाद नसिमुद्दिन सिद्दिकी वाय ३६ रा.सिल्लेवाडा खापरखेडा ,
३)टिपू उर्फ जाकिर अली वल्द हसमत अली इद्रिसी २८ वर्ष रा. वाड क्रमांक ३ वलनी सावनेर सावनेर ,
४)आशिष विजय शास्त्री वय १९ वर्ष रा. दहेगाव खापरखेडा ५)निखिल अशोक पासवान ३६ वर्ष रा. दहेगाव खापरखेडा यांचेसह नमूद जबरी चोरीची घटना केल्याचे सांगितले तसेच घटने चोरी गेलेल्या मुद्देमाल हा आरोपी टिपू उर्फ साकिर अली वल्द हसमत अली इद्रिसी यांचे ताब्यात असल्याचे सांगितले.
असे प्राप्त माहितीवरून मुख्य सूत्रधार आरोपी टीप अली वल्द शाकेर अली इस्मत अली इद्रिसी २८ वलनी सावनेर असल्याचे निष्पन्न झाले व गुन्ह्यातील चोरीस गेलेले मौल्यवान मुद्देमाल ताब्यात असल्याने गुन्हे शाखेने टिपू याचे मार्गावर होते याच दरम्यान आरोपी टिपू यास जलदर्शन बियर बार जवळ सावनेर रोड येथून ताब्यात घेण्यात आले असता त्यांचे नमूद जबरी चोरीचा गुन्हा केल्याने कबूल केले तसेच त्यांचे जवळून गुन्हातील मुद्देमाल एकूण ३,४०,१०० शंभर रुपये मिळून जप्त जप्त केलेले
१)एक लोखंडी चाकू किंमत १०० रुपये
२) ब्रासलेट ३० ग्राम १,लाख५० हजार रुपये
३) चेन (गोप)३० ग्राम १ लाख ५० हजार रुपये
३) अंगठी ७ग्राम 35000 रुपये ४)कानातील बाली एक ग्राम किंमत पाच हजार रुपये असे मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर कारवाई माननीय राकेश ओला पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण माननीय राहुल माकणीकर अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मलवार क्रमवार पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, जावेद शेख, लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, शैलेश यादव ,अरविंद भगत, सत्यशील कोठारे ,विनोद नरड, प्रणय बनाफर, सतीश राठोड, साहेबराव बहाळे ,यांचे पथकाने पूर्ण केली
गुन्हातील पाच ही आरोपी ना अटन करून पाराशिवनी पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे पुढील तपास करित आहे.