कन्हान ला दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले
#) पाच दुचाकीची चोरी, फक्त दोन दुचाकी चोर मिळाले, तीन दुचाकी चोर पकडण्यास अपयश
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच दुचाकी चोरी करण्यात आल्या यातील दोन दुचाकी चोरास गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर व कन्हान पोलीसांनी पकडले असुन अद्याप तीन दुचाकी चोरास पकडण्यास कन्हान पोलीसाना यश आले नसल्याने कन्हान परिसरात चोरी च्या घटना वाढुन दुचाकी चोरीचे व इतर चोरीचे प्रमाण वाढु लागले आहे.
शुक्रवार (दि.१५) जानेवारी ला तुकाराम नगर कन्हान येथील प्रभाकर वांदिले यांच्या राहते घरून भर दिवसा एँक्टीव्हा एम एच ४० व्ही १०२४ दुचाकी अज्ञा त चोरानी चोरून नेली. तिचा शोध घेऊन मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी अमोल प्रभाकर वांदिले तुकाराम नगर कन्हान हयानी तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी (दि.१८) ला कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा करून हे कॉ नरेश वरखडे पुढील तपास करित आहे. या अगोदर कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत १) अशोकसिंग ठाकुर यांची एमएच ४० ए जी ९६६६ दुचाकी सप्टेंबर २०२० मध्ये २) चेतन विनायक हिवसे अँक्टीव्हा एम एच ४० ए एच ३९५५ (दि.२२ /९/२०२०) ला ३़) कामठीची महिला राख विसर्जना करिता आली असता बीकेसीपी शाळा सामोरील स्टॉंड वरून दि ४ जानेवारी ला एम एच ४० ए डी १३११ अँक्टीव्हा दुचाकी चोरी. ४) रामबच्चन रामकिशन प्रसाद ४८ रा शिवनगर कांद्री पॅशन प्रो दुचाकी निळा कलर एम एच ४० ए एफ ८८८७ दि. ९/०१/२०२१ ला भाटिया कोल वॉसरीज गोंडेगाव डुमरी रोड येथुन चोरी. ५) अमोल प्रभाकर वांदिले यांची एँक्टीव्हा एम एच ४० व्ही १०२४ दुचाकी दि.१५ ला अज्ञात चोरानी चोरून नेली. यातील १) अशोकसिंग ठाकुर यांची एम एच ४० ए जी ९६६६ दुचाकी व २) एमएच ४० एजी ९६६६ तिरोडा येथुन गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर व कन्हान पोलीसानी आरोपी १) छोटेलाल ताराचंद कनोजे रा बिरसी तालुका तिरोडा, आरोपी २) सागर चव्हाण रा नागपुर यांना पकडुन दोन दुचाकीचा शोध लावला. तर पाच दुचाकी चोरीतील फक्त दोन दुचाकी मिळाल्या परंतु तीन दुचाकी चोरास पकडण्यास कन्हान पोलीसाना यश आले नसल्याने दुचाकी व इतर चोरीचे प्रमाण वाढु लागले आहे.