*फुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्याची मांगणी*
#) नागरिकांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हदीत येणार्या गांधी चौक मार्गा वरची पाण्याची पाईप लाईन गेल्या एका हफ्ता भरापासुन फुटल्याने पाणी रस्तावर वाहत असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत असुन गांधी चौकातल्या नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला एक निवेदन देऊन फुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्याची मांगणी केली आहे .
निवेदनात सांगितले कि पोलीस स्टेशन ला लागुन असलेल्या गांधी चौका पासुन मटन मार्केट होऊन पटेल नगर कडे जार्णार्या मार्गावरची पाण्याची पाईप लाईन गेल्या मंगळवार दिनांक १२ जानेवारी ला फुटली असुन पानी रोडावर वाहत असल्याने शुक्रवार दिनांक १५ जानेवारी ला सायंकाळ च्या सुमारास कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ॠषभ बावनकर मटन मार्केट कडे जात असता त्यांना रोडावर पाणी वाहतांनी दिसल्याने ॠषभ बावनकर यांनी प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेविका रेखा टोहणे व माजी नगरसेवक अजय लोंढे यांना फोन करुन पाण्याची पाईप लाईन फुटली असे सांगितले असता नगरसेविका रेखा टोहणे व माजी नगरसेवक अजय लोंढे यांनी दो अथवा तीन दिवसात कार्याला सुरवात करु असे सांगितले असता शनिवार दिनांक १६ जानेवारी ला नगर परिषद च्या कर्मचारी यांनी फुटलेल्या पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करण्याचे कार्य सुरु केले असता नगर परिषद च्या कर्मचारी यांनी फ्क्त गड्डा खोदुन ठेवले व कार्य बंद केले. सोमवार दिनांक १८ जानेवारी ला दुपार च्या सुमारास कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ॠषभ बावनकर यांनी नगर परिषद च्या मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , नगरसेविका रेखा टोहणे , व माजी नगरसेवक अजय लोंढे यांना फोन करुन सांगितले कि पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्यात यावा अशी मागणी केली असता नगर परिषद प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता कार्याला सुरवात केलेली नाही नगर परिषद च्या या लापरवाही कार्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत असुन या मार्गाने दिवसभर लहान – मोठे वाहन , मोटार – सायकल वाहन , व नागरिकांचे चहल – पहल सुरु असते व गड्डयाचा चारही दिशेला कुठल्याही प्रकारची सुरक्षा लावलेली नसल्याने मोठ्या दुर्घटनेची दाट शक्यता वाढली आहे. हे लक्षात घेत गांधी चौक च्या नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला एक निवेदन देऊन फुटलेल्या पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्याची मांगणी केली आहे .
निवेदन देतांनी कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ॠषभ बावनकर , गंगाधर ढोमणे , अजय चव्हान , रवि ढोमणे , अक्षय फूले , शुभम मंदुरकर , सह आदी नागरिक उपस्थित होते .