जिल्हा कार्यालयात संस्था संचालकांचे बोगस कागदपत्र सादर
#) किराया मागितल्याने एट्रासिटी लावण्याची धमकी
कन्हान : – अनेक वर्षापासुन आगैय्या राजैय्या केशेट्टी हे शिवनगर कन्हान येथील रहीवासी असुन हयानी २०१५ मध्ये आपल्या मुलाचा वास्तव्यासाठी गहुहिवरा रोड क्रांदी येथे घर बांधले. गैरअर्जदार कैलाश उद्यभान बोरकर संचालक हयानी उद्यभान पौढ मंतीमंद निवास शाळेकरिता केशेट्टी अर्जदाराशी संपर्क साधुन निवास स्थान भाड्याने करण्यात आले. आगैय्या केशेट्टी यांनी दरमहा ७००० हजार रूपये दराने घर किरायाने दिले. याप्रमाने अर्जदार व गैरअदार यांचा निवासस्थान विष यी ११ महिण्यांसाठी करार पत्र तयार केले गेले होते. २०१८ पर्यंत या तीन वर्ष सतत ११, ११ महिन्या चा करार करून दरमहा किराया दिले जात होता. सध्या २०१८-१९, २०१९-२० या वर्षाचा किराया न दिल्याने भाडे करार पत्र करण्यात आले नाही. तथापि या वर्षा चे घर करार पत्र जिपच्या समाज कल्याण विभागात सादर केले आहे. अर्जदार केशेट्टी व जिप समाज कल्याण प्रशासनाची दिशाभुल करण्यात येत आहे. केशेट्टी यांनी भाडे न दिल्याने निवास स्थान रिकामे करण्याची नोटीसही देण्यात आली. मात्र या नोटीसचा कैलाश बोरकर गैरअदारावर कोणताही परिणाम झाला नाही. तो भाडे दडपण्याठी व मोबाईल वरून भाड्ये मागितल्या बाबद अर्जदाराकडुन जाती वाचक प्रकरण (एट्रासिटी) दाखल करण्याची धमकी देतो. यास्तव मा. मुख्यकार्यपालन अधिकारी जि प नागपुर हयाना पत्र देऊन मा. विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर, मा.जिलाधिकारी, कार्यालय नागपुर, अध्यक्षा जि प नागपुर, समाज कल्याण अधिकारी जिप नाग पुर, पोलीस अधिक्षक ग्रामिण पोलीस नागपुर, कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान, थानेदार पोलीस स्टेशन कन्हान आदीना प्रतिलिपी देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अर्ज दाराला न्याय देण्याची विनंती केली आहे