बोरडा- निमखेडा रस्त्याच्या कामात दिरंगाईने नागरीकांचे आंदोलन
खा.श्यामकुमार बर्वे यांनी तातडीने अधिकारी व ठेकेदाराला आदेश
कन्हान,ता.२२
बोरडा- निमखेडा सिमेंट रस्त्याचे काम मागिल कित्येक वर्षापासुन कासव गतीने काम सुरू होते. पावसाळा सुरू होताच स्त्यावरिल खडयात पाणी साचुन चिखलातुन वाट काढत नागरिकांना ये-जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत बोरडा, निमखेडा, बोरी (राणी) येथिल नागरिकांच्या आंदोलनस्थळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भेट दिली.
संबधित अधिकारी व ठेकेदारास त्वरित रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिल्याने आंदोलन यशस्वी झाल्याचे गावक-यांनी समाधान मानले.
नागपुर- जबलपुर राष्ट्रीय सिमेंट चारपदरी रस्त्या वरील नेहरू दवाखाना कांद्री पासुन नगरधन मार्गे रामटेक कडे जाणा-या रस्त्याचे काम सुरू आहे. तर गोंडेगाव पुनर्वसन वसाहती पासुन बोरडा- निमखेडा पर्यंत सिंमेट रस्त्याचे मागिल २ ते ३ वर्षा पासुन कासव गतीने काम चालु होते. अर्ध्या रस्त्यावरून वाहतुक चालु असुन जागोजागी रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचुन चिखल होत असल्याने दररोज ये- जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यी, शेतकरी व परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. काही वाहन चालक खड्ड्यात पडून जखमी होत असल्याने शनिवार (दि.२२) जुन सकाळी ९.३० वाजता ग्रा.प.बोरडा सरपंचा रेखाताई डडुरे, निमखेडा सरपंचा कलावतीताई तडस, बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, सदस्य रामराव बंड यांच्या नेतृत्वात धनराज गडे, राजु डडुरे, दिनेश बंड, विनोद मानवटकर, प्रमोद डडूरे, गजानन कडु, शंकर सोनवणे, निरंजन बालकोटे, मुकेश सोनवणे सह बोरडा, निमखेडा, बोरी (राणी) येथील त्रस्त गावकरी नागरिकांनी ही समस्या त्वरित सोडवण्यास शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता या रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत काही वेळातच नव निर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आंदोलन स्थळी पोहचुन संबधित अधिकारी व कंत्राटदाराला फोनवर तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या पुढे सुद्धा कंत्राटदारांच्या हरगर्जीपणामुळे माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना त्रास होऊ देणार नाही आणि त्वरित काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
संबधित कंत्राटदार, अधिकारी आंदोलन स्थळी दुपारी १२ वाजता पोहचले असता प्रहार जनशक्तीचे रमेश कारेमोरे, जि.प.सदस्य व्यंकटेश कारेमोरे, कैलास खंडार यांनी त्यांच्याशी बोलुन त्वरित काम सुरू करून नागरिकांना या पुढे त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. काम सुरू झाल्याने शेतकरी, नागरिकांनी आपआपले ट्रॅक्टर बाजूला करून आंदोलन समाप्त केले. आंदोलन स्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहुन नागरिकांना समाजावुन त्यांची समस्या गंभीर असल्याने समोचाराने मार्ग काढण्यास सहकार्य केले.
Post Views: 780
Sun Jul 21 , 2024
गुरू पौर्णिमेला गुरूवर्यांची गुरूपुजा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कन्हान,ता.२१ जुलै गुरू पौर्णिमा सणाच्या मंगलसमयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास (दखने ) हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे रविवार (दि.२१) जुलै डोणेकर सभागृह, कन्हान ला गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू – […]