मंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा.
सावनेर ता :मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. करिता महाराष्ट्र राज्याचे पशसंवर्धन व दुग्ध विकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी स्थिनिक चीचपुरा येथील शाही मज्जिद येथे उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावनेर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे,सावनेर विधानसभा युवक कांग्रेस महासचिव इमरान शाह,शाही मस्जिद अध्यक्ष महबूब भाई,हपीज़ शाह,इकरार भाई,मुस्तुफा भाई, सत्तार भाई, सलाम भाई, कलाम भाई, आसिफ शाह,अरबाज शाह,गोलू शाह,आफताब मौलाना,रियाज़ भाई,सम्मू मिस्त्री, सादिक भाई,रफीक भाई, सौकत शाह उपस्थित होते