अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत शिवमंदीर जवळ फुकट नगर कांन्द्री येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करि त असतांना एक इसम अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळ गुण परिसरात दशहत पसरवितांना आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी अखिलेश सोमकुवर यास ताब्यात घेऊन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२१) जुलै २०२१ चे ४ ते ४:३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस परिस रात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरा द्वारे माहिती मिळाली की वाघधरे वाडी कन्हान येथील राह. इसम अखिलेश मुनेश्वर सोमकुवर वय २२ वर्ष राह. वाघधरे वाडी तारसा रोड कन्हान हा आपल्या जवळ हत्तीमार चाकु बाळगुण परिसरात दशहत पसरवत असल्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाल्याने शाहनिशा करून कायदेशीर कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीस परिसरातील दोन प्रतिष्ठीत नागरिकांना लेखी सुचनापत्र देवुन पंच बोलवुन त्यांचे सह वाघधरे वाडी येथे गेले असता एक इसम गुलाबी रंगाचा फुल बाह्यां चा शर्ट व पोपटी रंगाचा जिन्स वापरलेला दिसल्यास त्यास थांबवुन पंचासमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता अखिलेश सोमकुवर च्या जिन्स पॅन्ट मधुन कंब रेला एक हत्तीमार चाकु किंमत १०० रूपये चा मुद्देमा ल मिळुन आल्याने जप्त करून त्यास ताब्यात घेतले. सदर इसमाने मा. जिल्हाधिकारी साहेब नागपुर जिल्हा नागपुर यांनी निर्गमित केलेल्या आंदेशांचे उल्लंघन केल्याने त्याला मुद्देमाला सह पोलीस स्टेशन ला आणु न सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई विशाल शंभर कर यांच्या तक्रारी वरून अखिलेश मुनेश्वर सोमकुवर विरुद्ध अप क्र.२७२/२०२१ कलम ४/२५ भा.ह काय दा सह कलम १३५ मवोका अन्वये गुन्हा दाखल कर ण्यात आला असुन ही कारवाई नागपुर ग्रामीण पोली स अधिक्षक श्री राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्री राहुल माखणीकर, पोलीस उपअधिक्षक विभाग कामठी श्री मुख्तार बागवान, यांच्या मार्गदर्शनात कन्हा न पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, सपोनि सतिश मेश्राम, नापोशि राहुल रंगारी, पोशि संजय भदोरिया, मुकेश वाघाडे, विशाल शंभरकर सह कर्मचारी यांनी यशस्विते रित्या पार पाडली.