शिवसेना व्दारे नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व तहासिलदार यांना निवेदन देऊन जनता कर्फ्यु लावण्याची मागणी
कमलासिहं यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
कन्हान (ता प्र): – कन्हान शहरात व परिसरात कोरोना रुग्णांची दिवसेगणित संख्या वाढत असुन रुग्णांची मुत्यु संख्या वाढुन तीन युवकाचा मुत्यु ने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कोरोना रुग्णाची वाढती संख्येची साखळी रोखण्याकरिता कन्हात शहरात तिन दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याची मांगणी कन्हान शहर शिवसेनाव्दारे निवेदनाने करण्यात आली.
कन्हान शहर व परिसरात कोरोना रुग्णांची व मृत्युची संख्या वाढत असुन ही नगरपरिषद प्रशासन द्वारे शहरातील बाजारात सोशल डिस्टेसिंग व मास्कता वापर होत नसल्याचे दिसुन येत आहे. कन्हान शहर हे आजु-बाजुच्या ग्रामीण भागातुन शेतकरी व नागरिक खरेदी विक्री करण्याकरिता येत असतात. व्यापारी, भाजीपाला दुकानदार व नागरिक नियमाचे पालन करित नसल्यामुळे शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. करिता दंडात्मक कारवाई शहरात होणे गरजेचे झाले आहे. कन्हान शहर यात कन्हान शहर २ व कांद्री ग्राम १ युवकाचा मुत्यु चिंतेचा विषयाने शहरात भितीचे वातावरण झाल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यास रूग्ण संख्येची साखळी तोडण्या करिता कन्हान आठ दिवसाचा जनता कर्फ्यु लाव्ण्याची मागणी नागपुर जिला शिवसेना उपप्रमुख वर्धराज पिल्ले व महिला आद्याडी शिवसेना नागपुर ग्रामीण उपप्रमुख सौ. शुभागी घोगले ,यांचे संयुक्ताने यांचा नेतृत्वात नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर,मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, कन्हन ,तहासिलदार वरूण सहारे याना निवेदन तिन दिवसाची जनता कर्फ्यू ची मागणी ची निवेदन देत करण्यात आली. याप्रसंगी वर्धराज पिल्ले(उप जिला प्रमुख ,नागपुर ग्रामिण),सौः शुभागी घोगले (शिवसेना महिला आघाडी ,उप प्रमुख,नागपुर ग्रामिण),महेश खवले (शहर शिवसेना प्रमुख),भारत पगारे ,सौ मनिषा चिखले, सौ लिना हारोडे, सौ माला शेड़े सह अनेक शिवसेना कार्यकर्ता आदी उपस्थित होते.