सावनेर येथील दहावी ” C.B.S.E. “पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय :  अँड.अरविंद लोधी

सावनेर येथील दहावी ” C.B.S.E. “पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय :  अँड.अरविंद लोधी

*सावनेर पालिकेचे उपाध्यक्ष अँड.अरविंद लोधी यांची विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी*

सावनेर – तालुक्यातील सावनेर येथे खापा रोडवरिल के. जॉन पब्लिक स्कूल असुन (C.B.S.E) या शाळेतील मार्च 2019 दहावीच्या परीक्षेत काही विद्यार्थी काही विषयात नापास झाल्यामुळे त्यांनी पुरवणी परीक्षा देण्याकरिता फॉर्म भरलेत व त्यांना नुकतेच परीक्षा पत्र (हॉल तिकीट) देण्यात आलेत व काही मुलांना परीक्षा केंद्र कल्याण ठाणे मुंबई पाहून पालकांसह मुलांना आश्चर्याचा धक्का बसला.
सध्या कोरोनाचा परिस्थितीत अनेक रेल्वेसेवा तुरळक असताना, अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती योग्य नसताना, अज्ञान दहावीतील विद्यार्थी 800 km अंतरावर पेपर द्यायला कसा जाईल, तो कोठे जेवेल, तू कुठे राहील व अभ्यास कसा करेल हे सर्व प्रश्न पालकांसमोर उपस्थित आले आहे, या प्रकारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रकार घेऊन काही पालकांनी सावनेर पालिकेचे उपाध्यक्ष अँड.अरविंद लोधी यांची भेट घेतली व त्यांनी तातडीने CBSE चे दिल्ली, चेन्नई च्या कार्यालयासह मा. सुभाषचंद्र गर्ग, उपसचिव CBSE विभाग, विश्रांतवाडी पुणे यांना विनंती करून सावनेरच्या मुलांना नागपूर जिल्ह्यात तात्काळ सेंटर देण्याची मागणी केली , तसेच असा प्रकार ज्या ज्या शाळेत घडला असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी HARKARA CBSE App वर तात्काळ संपर्क करून मुलांना न्याय मिळवून देण्याची विनंती केलेली होती.


हि बातमी रितसर व योग्यरितीने मागणी झाल्यामुळे CBSE बोर्डाने तात्काळ कार्यवाही करित सावनेर तालुक्यातील मुलांना नागपूर येथिल परिक्षा सेंटर व हॉल टिकीट देण्यात आले . या प्रकरणाला वृत्तपत्रानी प्रकरण उचलून चांगल्या प्रकारे प्रकाशित केल्याने मुलांना व पाल्यांना न्याय मिळाला म्हणुन अँड.अरविंद लोधी व पालकांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात   

Tue Sep 22 , 2020
ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात  #) ग्राम विधुत व्यवस्थापकांचे ६ महिन्याचे थकीत मानधनाची मागणी.   कन्हान : – सरकारने तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विधुत व्यवस्थापकांची नियुक्ती केली. हे गावातील नागरिकांना चांगली व तत्पर सेवा देत असुन मागील ६ महिन्या पासुन मानधन थकीत असल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta