क्रांन्दी येथे विद्यार्थी समाधान व राजस्व भव्य शिबिर
नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करावे – तहसीलदार प्रशांत सांगळे
कन्हान, ता.22 सप्टेंबर
जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या शिबिर स्थळाची व तयारीची पाहणी तहसीलदार प्रशांत सांगळे, गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना हटवार, ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे, धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे, नायब तहसीलदार रणजित दुसावार, महिला बाल विकास अधिकारी सौ. काळे, कन्हान केंद्र प्रमुख सौ.लता मालोदे, सेतू सुविधा केंद्राचे शरद वाटकर, धर्मराज प्राथमिक शाळेचे शिक्षक भिमराव शिंदेमेश्राम यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
उद्या होणाऱ्या समाधान शिबिरात जात प्रमाणपत्र,
उत्पन्न प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड दुरुस्ती व बनवणे, मतदार नोंदणी यांच्यासह विविध शासकीय कामे पूर्ण करून देण्यात येणार आहे. कांद्री, कन्हान, खेडी, बोरी, निमखेडा, निलज, खंडाळा, वराडा, टेकाडी व परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे व गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना हटवार यांनी केले आहे.
Post Views: 822
Thu Sep 22 , 2022
भारतीय स्टेट बॅंक, एटीएम मधुन ७४,००० रु. लंपास कन्हान,ता.23 सप्टेंबर कन्हान शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या खंडेलवाल नगर, शाखा एटीएम मधुन अज्ञात युवकांने गोष्टीत गुंतवून कार्डची हेराफेरी करीत ७४,००० रु.रोख लंपास केल्याचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांच्या माहिती नुसार रविवार ता.१८ सप्टेंबर ला सकाळी १०:३० वा च्या दरम्यान […]