भारतीय स्टेट बॅंक, एटीएम मधुन ७४,००० रु. लंपास
कन्हान,ता.23 सप्टेंबर
कन्हान शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या खंडेलवाल नगर, शाखा एटीएम मधुन अज्ञात युवकांने गोष्टीत गुंतवून कार्डची हेराफेरी करीत ७४,००० रु.रोख लंपास केल्याचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांच्या माहिती नुसार रविवार ता.१८ सप्टेंबर ला सकाळी १०:३० वा च्या दरम्यान पुंडलीक केशवराव इंगोले (६३) रा.श्रीकृष्ण मंदीर, टेकाडी हे पत्नी सोबत नागपुर ला जात असतांना कन्हान येथील भारतीय स्टेट बँकेच्या खंडेलवाल नगर, शाखा एटीएम मधुन पैसे काढण्याकरिता गेले. एटीएम मध्ये असलेल्या अज्ञात युवकांने पुंडलीक इंगोले यांचा एटीएमची हेराफेरी करून बाहेर निघून गेला. पुंडलीक इंगोले यांचा लक्षात येताच बाहेर येऊन युवकाचा शोध घेतला. मिळुन न आल्याने लगेच इंगोले यांच्या खात्यातुन ७४,०००/ – रु.कमी झाल्याचा मॅसेज आला. पुंडलीक इंगोले यांनी पुतन्याला घटनास्थळी बोलवुन एटीएम कार्ड बंद केले. अज्ञात युवकाने एटीएम कार्डची हेराफेरी करून फसवणुक केल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पो.ह.प्रशांत रामटेके शोध घेत आहे .
Post Views: 1,077
Fri Sep 23 , 2022
प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . […]