श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी साजरी
कन्हान, ता.२१
श्री संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी श्री संत गजानन महाराज मंदीर कन्हान व कांद्री येथे भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
बधवार (दि.२०) सप्टेंबर ला श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य कन्हान शहरातील पांधन रोड, तिवाडे ले-आऊट श्री हनुमान आणि श्री संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी गजानन महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करून अभिवादन केले. महिलांनी व नागरिकांनी भजन, कीर्तन, दहीकाल्याचा कार्यक्रम करित परिसरातील भाविकांना प्रसाद वितरण करुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कांद्री ला गजानन महाराज पुण्यतिथी साजरी
कांद्री येथील स्वर्गीय सोमाजी गिऱ्हे यांचा शेतातील श्री संत गजानन महाराज मंदीरात पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम नागरिकांनी गजानन महाराज यांचा प्रतिमेची विधिवत पूजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कांद्री द्वारे भजन, कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी दहीकाल्याचा कार्यक्रम करुन परिसरात भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला. शेवटी नागरिकांनी गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रसंगी श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कांद्री चे फजित बावणे , सेवक गायकवाड, अरुण पोटभरे, राजेश पोटभरे, ज्ञानेश्वर गिरे, धनराज क्षीरसागर, सुनील गिरे, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, संजय गिरे, विनोद वानखेडे, पुष्पा वानखेडे, श्रीदेवी चापले, संध्या गिरे, विनू यादव, नरेश डांगरे, प्रफुल गायकवाड, विक्रम गायकवाड, शिवाजी चकोले, महादेव मानकर, रमेश पोटभरे, कवडू आखरे सह आदि गावकरी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Post Views: 692
Fri Sep 22 , 2023
जीवन रक्षक दल द्वारे ठाणेदार सार्थक नेहेते यांच्या सत्कार कन्हान,ता.२१ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या जीवन रक्षक दल कन्हान च्या पदाधिकारी व सदस्यांनी सत्कार करुन परिसरात कायदा, शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. कन्हान शहरात आणि ग्रामिण भागात मागिल काही महिन्या पासुन गुन्हेगारी व […]