जीवन रक्षक दल द्वारे ठाणेदार सार्थक नेहेते यांच्या सत्कार
कन्हान,ता.२१
पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या जीवन रक्षक दल कन्हान च्या पदाधिकारी व सदस्यांनी सत्कार करुन परिसरात कायदा, शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे.
कन्हान शहरात आणि ग्रामिण भागात मागिल काही महिन्या पासुन गुन्हेगारी व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात डोके वर काढत वाढत आहे. नव्याने पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी कन्हान पोलीस स्टेशन चा कार्यभार सांभाळत अवैध जनावरांची वाहतुकी वर आळा, जुगार अड्यावर कारवाई, अवैध कोळसा, रेती सह अनेक अवैध धंद्यावर अंकुश लावण्यास कारवाई सातत्याने सुरु केली आहे. परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करने सातत्याने सुरु असुन कायदा, कडक बंदोबस्त असल्याने जीवन रक्षक दल कन्हान चे पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्ष विजय केवट यांचे नेतृत्वात पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांची भेट घेऊन त्यांचा शाॅल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी, घरफोडी, असामाजिक तत्व अशा घटनांवर अंकुश लावण्याकरिता परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची आणि कायदा, शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. प्रसंगी नितेश केवट, महादेव केवट, अनिकेत मेश्राम, शुभम गोंडाणे, अनंत मेश्राम, प्रकाश मेश्राम, पवन ऊके, रोशन ऊके, गंगाधर मेश्राम, रोहित सहारे, ईश्वर गोंडाणे, कमलेश दुधबावने, सुधाकर गोंडाणे, आकाश केवट सह पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 688
Fri Sep 22 , 2023
कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार कन्हान,ता.२१ पोलीस स्टेशन हद्दीतील टेकाडी येथिल कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग महल्ले याला उपविभागिय अधिकारी रामटेक यांचे आदेशाने नागपुर जिल्हयातुन सहा महिन्याकरिता हद्दापार कऱण्यात आले आहे. टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग जनार्धन महल्ले याचा गुन्हेगारी […]