कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार

कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार

कन्हान,ता.२१

   पोलीस स्टेशन हद्दीतील टेकाडी येथिल कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग महल्ले याला उपविभागिय अधिकारी रामटेक यांचे आदेशाने नागपुर जिल्हयातुन सहा महिन्याकरिता हद्दापार कऱण्यात आले आहे.

  टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग जनार्धन महल्ले याचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहशतीचे प्रभाव संपविण्याचा उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६ (१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ईस्तगाशा तयार करुन वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी सुनावनी अखेर सदर भुंजग नागपुर ग्रामिण जिल्हयातुन सहा महीन्यासाठी हद्दपार केल्याचे आदेश पारित केले. आदेश तामिल करून त्याला त्याच्या नाते वाईकांकडे तुमसर जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए.पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदशनात वरिष्ठ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि चेतनसिंह चौहाण, पो.हवा जमाल मुदस्सर, हरिष सोनभद्रे, पोना अमोल नागरे, अनिल यादव, पो शि अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, नवीन पाटील यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीसांनी शहरात काढला रुट मार्च सण उत्सव शांततेत साजरे करा, पोलीसांचे नागरिकांना आव्हान

Fri Sep 22 , 2023
कन्हान पोलीसांनी शहरात काढला रुट मार्च सण उत्सव शांततेत साजरे करा, पोलीसांचे नागरिकांना आव्हान कन्हान,ता.,२१     कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात सण उत्सव दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये व शांतता , सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढुन सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta