क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी साजरी
कन्हान : – गोंडवाना गणतंत्र पार्टी व्दारे राय नगर कन्हान येथे गोंडवाना समाज बांधवाचे प्रबोधन करून क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजाना सळो की पळो करून सन १८५८ च्या कालखंडात भारतात स्वातंत्र्या ची चळवळ ऊभारून क्रांतीचा लढा देणारे क्रांतीवीर पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी गुरूवार (दि.२१) ऑक्टोंबर ला रायनगर कन्हान येथे तिरू सुखलालजी मडावी च्या घरी गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष व जि प सदस्य तिरु हरिशभाऊ उईके यांचे अध्यक्षे त क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके अमर रहे च्या जयघोषात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष तिरू सुखलाल जी मडावी, गोंगपा जिल्हाध्यक्ष तिरू धनराज मडावी, नगरसेवक तिरू विनय यादव, तिरू राजेश फुलझेले, तिरू भारत पगारे, तिरू खुशाल बनसोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विर बाबुराव शेडमाके नी केलेल्या क्रांतीचा इतिहासाचे मार्गदर्शन करून उपस्थित जन समुहास अन्याय व अत्याचारा विरूध्द लोकशाही मार्गाने लढा देऊन गोंडवाना समाजातील एकता प्रस्थापित करावी असे आवाहन तिरू हरिश भाऊ उईके हयानी केले. तसेच महाविदर्भ जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तिरु संजय भाऊ सत्येकार यांनी आदिवासी, गोंडवाना समाजा विषयी आपले मनोगत व्यकत करित प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गोंगपा कन्हान अध्यक्ष तिरु सोनु मसराम यांनी तर आभार प्रदर्शन संदीप परतें यांनी केले.
कार्य क्रमाच्या यशस्वितेकरिता तिरू शंकर ईनवाते, तिरू संदीप परते, तिरू अनिल पंधराम, तिरू बंडु ईरपाते, तिरू रजनिश मेश्राम, तिरू अनंतराम टेकाम, तिरू जे डी भलावी, तिरू राजवीर मडावी, तिरू अनिल मरस्कोल्हे, तिरू पप्पु मरकाम, तिरू राजेश टेकाम, तिरू अरुण जगणेकर, तिरू सुरज वरखडे, तिरू शिवचरण कुंजाम, तिरू मनोहर परतेती, तिरुमाय रत्नाबाई मडावी, सरस्वती उईके, सुशिला ईनवाते, संगिता कुंवर, केशरबाई सिरसाम, सरोज मरस्कोल्हे, सालुबाई सुर्यवंशी आदी समाज बांधवानी सहकार्य केले.