कन्हान ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण

कन्हान ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण

कन्हान : – शहर विकास मंच द्वारे पोलीस स्मृति दिवसा निमित्य गांधी चौक कन्हान येथे मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार, पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौनधारण करून कर्तव्य बजावित शहिद झालेल्या सर्व भारतीय पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

          गुरुवार (दि.२१) ऑक्टोंबर २०२१ ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे पोलीस स्टेशन च्या बाजुला गांधी चौक कन्हान येथे कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, सपोनि आमि तकुमार आत्राम, पोहवा अरूणकुमार सहारे, पोशि शरद गिते व शिक्षिका वर्षा सिंगाडे आदी मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी व नागरिकांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून लडाख येथे चीनच्या सैनि का सोबत झालेल्या भाड हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत मसार, महादेव लिल्हारे, संजय चोप कर, बलीराम यादव, पाली, हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, महेंद्र साबरे, सुरज वरखडे सह मंच पदाधिका-यांनी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान

Fri Oct 22 , 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान #)  कन्हान-पिपरी नगरपरिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी द्वारे परिसर स्वच्छ केला.  कन्हान : –  परिसरात नगरपरिषद कन्हान-पिपरी व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड कन्हान ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान  राबवुन प्लास्टिक वेचुन रस्त्याची स्वच्छता व परिसर स्वच्छ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta