सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन
कन्हान,ता.२१
माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती हनुमान नगर कन्हान येथील सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, वाचन कक्षाचे संचालक प्रकाश नाईक, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर अवचट यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी डॉ.कलाम यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राजेंद्र खंडाईत यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन चरित्रावर आणि साध्या वागणुकीवर प्रकाश टाकला. उपस्थित वाचकांकडून ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला व त्यांना पुस्तक वाचन हे जीवनकल्याणाचे माध्यम समजावून सांगण्यात आले.
प्रास्ताविक दिनकर मटके यांनी केले, सूत्रसंचालन कुणाल कोल्हे यांनी केले. ग्रंथपाल श्याम बोराई यांनी आभार व्यक्त केले. आशिष घोरपडे, यश तेलुटे, अभिषेक निमजे, मनोहर कोल्हे, चेतन ठाकरे, शुभम शेंडे, रमण चौहान, अंकित लाडेकर, मनीष महाले, स्वप्नील भेलावे, साक्षी हुड, कृष्णाली कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.
Post Views: 896
Thu Oct 26 , 2023
भारतीय कलाकार शाहीर मंडळ तर्फे काटोल येथे रविवार ला कलाकारांचा मेळावा काटोल,ता.२६ काटोल तालुका आणि नरखेड तालुका च्या वतीने २९ ऑक्टोंबर २०२३ रविवार ला श्री हनुमान मंदिर, आय.यु.डी.पी.काटोल येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व शाहीर कलाकार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा […]