कन्हान ला स्वईच्छेने सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन 

कन्हान ला स्वईच्छेने सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन 

#) कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील बैठकीत व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने निर्णय. 

#) कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाच्या स्व: ईच्छा लॉकडाऊन ला नागरिकांनी सहकार्य करावे. 

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान-कांन्द्री दुकान दार महासंघा व्दारे कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे बैठक घेऊन वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडु न सर्व व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने कन्हान परि सरात स्वईच्छेने सोमवार ते रविवार हे सात दिवस पुर्ण पणे कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असुन सर्व नागरिकांनी दुकानदार महासंघ, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला सहकार्य करित स्व:ईच्छा कन्हान लॉकडाऊन यशस्विरित्या पार पाडुन कोरोना महामारीस हद्दपार करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. 

     कन्हान शहर व परिसरात कोरोना रूग्णाची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने नागरिकां च्या हितार्थ कोरोना विषाणु महामारी रोखण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्यास कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने नगरपरिषद कन्हा न-पिपरी येथे गुरुवार (दि.२२) एप्रिल ला कोरोना रोख थाम पार्श्वभुमिवर बैठकीत कन्हान परिसरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकानदारांच्या स्व: ईच्छेने कन्हान परिसरात सोमवार दिनांक २६ एप्रिल ते रविवार २ मे पर्यंत असे सात दिवस पुर्ण पणे कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असुन सर्व नागरि कांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस जिवनावश्यक वस्तुची खरेदी करून घेऊन या सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून दुकानदार महासंघ, नगरपरिषद,कन्हान  पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.तसेच विनाकारण घरा बाहेर पडु नये, मास्क, सेनिटाइजर व सोशल डिस्टे न्सिगचे पालन करित ४५ वर्ष व वरिल सर्व नागरिकां नी लसीकरण करून कोरोना महामारी हद्दपार करण्या स सहकार्य करावे. अन्यथा आदेशाचे पालन न करणा-या नागरिकांवर व आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिताचे कलम१८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कार वाई करण्यात येईल असे कडकडीचे आवाहन मुख्या धिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा संदीप कदम यांनी केले आहे. याप्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोले, कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी, सचिव प्रशांत बाजीराव मसार, सचिन गजभिये, चंद्रशेखर कळमकर, संजय खोब्रागडे, राम तदाणी, प्रदीप गायक वाड, मोटवाणी, बापु चकोले, अशोक मोरपाना, सुनिल बारईकर, चिंदु मालाधरे, नितीन मेश्राम, बाबुभाई, इस्राईल भाई, संजय गंगवाणी आदी दुकानदार उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लिंकवर क्लिक करताच उडाले ३० हजार : सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

Fri Apr 23 , 2021
सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर येथे श्री . विनोद रामचंद्र येरपुडे , वय ३७ वर्ष रा . १४२ , ओमकार नगर , मानेवाडा , नागपुर यांना ऑनलाईन शेअर्स घेण्यासाठी वारंवार गैरअर्जदार यांचा फोन आला शेअर्स खरेदी केल्यास त्यांना त्यावर नफा मिळेल , असे सांगितले त्यावरून अर्जदार हे आमिषाला बळी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta