शहरात वीज पुरवठा नियमित करण्यात यावा शहर युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी.
कन्हान, ता.२३
शहरात मागील कित्येक दिवसा पासुन दिवस-रात्र वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाल्याने कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी च्या नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालया चे उप मुख्य अभियंता मा. भगत साहेब यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.
मागील एक ते दोन महिन्या पासुन उन्हाचा पारा अतिशय वाढला आहे. तापमान सध्याचा स्थितीमध्ये ४४ अंश सेल्सिअस वर गेले. आणखी काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले असुन नागरिकांना आवश्यक असेल तरच बाहेर जाण्यास सांगण्यात आले. असताना कन्हान-पिपरी परिसरात गेल्या कित्येक दिवसा पासुन विजेचा लपंडाव सुरू असुन वीज ही नियमित दिवस रात्र खंडित होत आहे. विशेषता कन्हान नगरपरिषद अंंतर्गत विवेकानंद नगर, शिवाजी नगर, पटेल नगर प्रभाग ७ , गणेश नगर, वाघधरे वाडी, एम जी नगर भागातील वीज सतत खंडीत होऊन चार ते पाच तास सतत विज बंद राहते. श्रीमंता कडे इनव्हेटर, सोलर असल्याने त्याना काही फरक पडत नाही. परंतु परिसरात मध्यम वर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने महिला, युवक, वयोवृध्द आणि लहान मुलाना दिवस रात्री ला विज खंडित झाल्याने गर्मीमुळे नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. सदर विषय गंभीर्याने घेत कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी यांचा नेतृत्वात कॉग्रेस पदाधिका-यानी कन्हान महावितरण कार्यालया चे उप मुख्य अभियंता भगत साहेब यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महा वितरण कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखाताई टोहने, प्रदीप बावणे , आनंद चकोले, अनस शेख, अर्शीद शेख, अल्फाज शेख, आनंद मेश्राम, मोहित मडामे, साहिल खान, आयुष यादव, ऋतिक मानकर, विवेक उमरकर, रोशन सिधराम, सलमान शेख सह युवक काँग्रेस चे पदाधि कारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 787
Thu May 25 , 2023
बारावीच्या परीक्षेत कु.तनिशा राऊत तालुक्यात प्रथम कन्हान, ता.२५ बारावीच्या नुकताच परीक्षेच्या निकाल लागल्याने पालकवर्गात मुलांना घेऊन कौतुक आनंदाचे वातावरण असुन महाविद्यालय संचालक मंडळ, अध्यक्ष व शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थीगणात मध्ये एकदाचा निकाल लागल्याने सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यात धर्मराज कनिष्ठ […]